रक्षाबंधन आणि इंद्र
!!! रक्षाबंदन !!!
🗣नक्की वाचा ......
प्रेयसी :- मला वाटले आज तू नाही येणार भेटायला !!
प्रियकर :- असे का ?
प्रेयसी :- आज रक्षाबंधन आहे ना,म्हणून ..... !!
प्रियकर :- आज मी जरी खूप कामात
असतो तरी तुला भेटायला नक्कीच आलोच असतो ............
कारण
इतिहासामध्ये लिहिले आहे कि,"युद्धामध्ये इंद्र देव,
दैत्यांकडून हरायाला आला होता,तेव्हा ऋषींनी एक
धागा मंत्रून इंद्राच्या पत्नीकडे दिला व
तो धागा इंद्राच्या पत्नीने इंद्राला बांधिला व
इंद्राची रक्षा करण्यासाठी प्रार्थना केली,त्यावर
इंद्राचा विजय झाला"..........
.आज हा धागा बहिण आपल्या भावाला बांधते पण
पूर्वीच्या काळी,एकमेकांची रक्षा करण्यासाठी साठी हा धागा बांधण्यात
येत होता,
अगदी पत्नीने पतीला,
आईने मुलाला व
मुलीने वडिलांना राखी बांधल्याची कित्येक उदाहरणे
आहेत,.............
.आणि म्हणून मी आज तुला भेटायला आलो
आणि ह्या पवित्र दिवशी आयुष्यभर
माझ्या बायकोची म्हणजेच तुझी रक्षा करेन हे खास
सांगायला आलो आहे !!
तात्पर्य :-१) समाजातील मुलींची,
मग ती बहिण असो, मैत्रीणअसो,
प्रेयसी असो,
बायको असो किंवा
अनोळखी मुलगी असो,
त्यांची रक्षा करणे व त्यांना अन्यायापासून वाचविणे हे
प्रत्येक मुलाचे कर्तव्य आहे !!
२) अभिमान आहे भारतीय असल्याचा कारण हा सण फक्त
भारता सारख्या सुसंकृत देशात
साजरा केला जातो ............
टिप्पण्या