टिव्हिवाले साहेब

टिव्हिवाले साहेब तुम्हाला दाखवायच ते दाखवा...

पण पठारभागाच रडगाणं
टीव्ही वरती दाखवा
जपान दाखवा,जर्मनी दाखवा
ब्राझील  अन इटली दाखवा
पण
भाव नसलेली आमची दुधाची किटली पण दाखवा..

😔😔

मोदी दाखवा, कोट दाखवा
रिज़र्व बँकेच्या नोट दाखवा
पण
उपाशी आमच्या जनावराचे
साहेब फक्त पोट दाखवा...

😔😔😔

सिनेमा दाखवा, नाटक दाखवा
हाउस फुल अशी थिएटर दाखवा
पण
गरीब आमच्या शेतकऱ्यांची
उगळलेली खेटर दाखवा...

😔😔😔

नेते दाखवा ,खादी दाखवा
नेत्यांसोबतची मादी दाखवा
पण
बैला विना पडलेली
चाबकाची वाधी दाखवा...

😔😔😔

डान्स दाखवा ,नाच दाखवा
ठेक्या वरच्या लावण्या दाखवा,
पण
तरमळलेल्या जनावरांना
नसलेल्या छावन्या दाखवा...

😔😔😔

रामायण दाखवा,
महाभारत दाखवा
बायबल अन् कुरान दाखवा
पण
पाण्या विना पेटलेल
पठार भागाच सरान दाखवा..

😔😔😔

टिव्हिवाले साहेब तुम्हाला दाखवायचे ते दाखवा...
  पिश्चरची फाईट दाखवा !!! .साहेबांची ऐट दाखवा .
पण
टीव्हीवाले साहेब आमच्या शेतकऱ्यांची शेतात पाणी भरण्याची नाईट पण दाखवा...

😔😔😔

कवी- एक शेतकरी

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट