नात्यांवरील गोष्ट

मी एका हाँटेलमध्ये गेलो. "मिसळ-पाव" संपवून

मी चहा घेतला.

तेवढ्यात तिथे
एक ५०-५५ वर्षाची
म्हातारी बाई आली.

डोक्यावर भल मोठ
जळणाचं ओझ
तिनं
बाजूला टाकल.
कुठेतरी एखादा
काळा केस,
कपाळावरती
मोठी कूंकुवाची छटा. घामामुळे
कूंकुवाचा
लाल रंग
भुवईपर्यत आलेला,
धारदार नाक,
सूरकुतलेले हात,

तिन-चारजोड देऊन
हातानेच शिवलेल
नववारी लुगड
आणि चोळी......
असा काही
तिचा वेश होता....

म्हातारी -
"नुस्तच कालवण
मिळल का गं बाई?????
माझ्याकडं
भाकर हाय".....

'तिचा होकार'
मिळताच
काळपट फडक्यातून
त्या म्हातार्या बाईने शिळी भाकर काढली.....

आणि
दिलेल्या कालावणावर अधाशिपणाने खाऊ
लागली......

मी
विचार करायला लागलो...
- आपण पैसे द्यावे
का?

हिला कुणीच नसेल का?

आणि असेल तर?
अशी वेळ का यावी तिच्यावर??

इतक्यात
तिची भाकरी
संपण्याच्या आत
ती हाँटेलवाली मुलगी म्हणाली,

"आजी, मिसळपाव घ्या!!
पैसे नाही घेणार!"

ती आजी बाई म्हणाली :- पोरी,
आज खाईन

पोटभरून.......
पण उदया??

मुलगी म्हणाली :- तुम्हाला मुलबाळ नाही का?

त्यावर ती म्हणाली,-
" तसं नाय काय,.........

पोरगा मोठा सायब हाय,.....
परदेशाला इंजीनियर

हाय.....
पण त्याला येळच न्हाय!!!!!!!

कानाखाली कोणीतरी
जोराची चपराक
मारावी
आणि
त्याचा आवाज
मेंदूपर्यत
घुमावा
तसे हे शब्दमाझ्या कानावर पडले

आणि
विचारांच काहूर माजलं............

'माणूस इतका बदलतो का?'

आपल संपूर्ण आयुष्य वाहून घेणा-या
या माऊलीची
त्याला क्षणभरही
आठवण येतनसेल का? आणि
सगळच
अनुत्तरीत होतं.

माझा चेहरा
खाली घालून
मी आता विचार करीत
होतो........

इतक्यात्......
माझ्या
पाठीवर
तोच
थरथरता
हात
फिरला.......

मी वरती पाहीलं
तर
तीच बाई
मला म्हणाली. :-

"इतका विचार करु नकोस बाळा",,,,,,,,,
तुझ्या आई-
बापाला निट जप... म्हणजे झालं.......

मग तर
मेल्याहून मेल्यासारख
झालं,

मी आता फक्त रडायचाच बाकी होतो.

कारण
एका क्षणात माझं पूर्ण अंतरंग
त्या माऊलीन
वाचलं.

पण
आम्हाला आमच्याच
आई-वडीलांच थोडस
दु:ख सुद्धा कधीच जाणता येत नाही.......
वेड घेउन पेड गावला तर अगदी रोजच जात असतो आम्ही........

जिवनाच्या सचोटीत
एवढं शिक्षण
घेऊनही आम्ही
अगदीचअडाणी
वाटतो यांच्यासमोर!

कुठं शिक्षण घेतल असेल यांनी हे???? ,
सेटलमेंट,
न्यू जॉब,
इनक्रिमेंट,
प्रमोशनच्या घोळात

आम्ही ही
"आमची माणसं"
कुठ हरवुन बसतो
आम्हालाच कळत नाही.
डोक जड झालं.

मी उठलो
आणि
चालू लागलो.....

शेजारच्या जिल्हापरिषदेच्या शाळेत मास्तर
मूलांना विचारतात  आपण काय शिकलो?

मी मनाशीच उत्तर दिलं, आयुष्यात इंजिनिअर
नाही होता आलं तरी चालेल पण,
चांगला,
जबाबदार माणूस जरुर व्हायचं ....

बास!
हास्य विनोद, हि पार्टी अशी हि तशी,
हे सगळं शेयर करताना आपण विचार नाही करत ना... 
मि नाही म्हणत हा sms १० लोकांना पाठविल्यावर तुम्हाला सुख मिळेल
पण तुम्हिच विचार करा वाटलं तर परत एकदा वाचा आणि ठरवा कोणाचा फायदा होईल का? तुम्हाला सुख भेटेल का?
आणि मगच आपल्या आई वडिलांसाठी whatsapp चा 1 मिनिट खर्च करा plz.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट