दारुबंदी
🚮🚮दारू शिवाय आंनद साजरा करता येतो..
आपले पंजोबा..दारूत गेले.
आजाबो दारूत गेले..
वडीलही दारूत जगले..
आता आपणही तेच..??
विचार तर कराल...??
हल्ली फँशन झालिय की दारू शिवाय नाचता येत नाही..मज्जा येत नाही..
पण खरचं का आपण फक्त दारू पिऊनच आंनद घेऊ शकतो..दारू पिऊन किंवा मित्र मंडळीला पार्टी देऊन आपण एक प्रकारे तरून पिढी बरबाद करीत असतो..
मित्रांनो...लग्न दारू शिवाय होऊ शकत नाही का ?
आता काही दिवसानी लग्न सराई चालू होत आहे. तेव्हा प्रत्येकास नम्र विनंती आहे की....आपल्या घरच्या लग्नात दारू कुणाला ही देऊ नये. पाजू नये.
कारण आज आम्ही पहातो की लग्नात लोकं नाचावेत म्हणून दारुची व्यवस्था करण्यात येते, व यजमान ला वाटते की लोक नाचले म्हणजे लग्नात मजा आली पण .....तो आमचा गैरसमज आहे कारण लग्न प्रसंगात आम्ही तरूणांना विष देत आहोत नविन पिढी अशाच कार्यक्रमात प्रथम विष पिण्यास शिकत आहे.
सज्जनानो.. कारण आज समाजात लहान मुले सुद्धा व्यसनाच्या आहारी जात आहेत त्याला कारण लग्न प्रसंगात फुकट मिलनारी दारु...!
यातून आपल्या गावचा विकास आणी प्रगती तर दुर राहिली उलट अधोगतीच होत चालली आहे . आज मजा म्हणून पिणारी मुले उद्या व्यसनी होतील , व त्यांच्या आई _ वडीलांची स्वप्नं पाण्यात मिळतील याला कारणीभूत आम्ही ठरू तुम्हाला वाटेल मी एकट्यान नाही दिली तर काय फरक पडणार आहे , पण...
मी सुधारलो तर घर सुधरेल व घर सुधरले तर गाव सुधरेल ... फक्त मोठे विचार whatsapp किंवा facebook वर ठेवून नाही तर पहिले आमच्या जिवनात उतरले पाहीजेत. तेव्हा विचार करा , थोडा त्रास होईल कदाचित लोक हसतील लग्नात मजा नाही आली. पण काय फरक पडत नाही ... लग्नात दारुचे वाचलेले पैसे शाळा किवां आश्रमाला देणगी दया खरा आनंद मिळेल.
*एक पाऊल परिवर्तनवादी..*
*नव्या पिढीला घडवण्यासाठी...*✍🏿
टिप्पण्या