विचारवेध.....
✒.........विचारवेध..........🎯
जेव्हा आपण स्वतःच्या कार्यक्षमतेवर प्रबळ विश्वास ठेवुन एखादं काम करतो , तेव्हा आपण यशाच्या जवळ आसपास पोचलेलो असतो.त्यासाठी सर्वप्रथम आपल्या मनात आत्मविश्वास असावा , अहंकार नाही.कारण अहंकार हा माणसाला नक्कीच संपावत असतो , याचा इतिहास साक्षीदार आहे.लंकाचा राव आणी रावांचा लंक होण्यास वेळ लागत नाही.कुठलेही कार्यक्षेत्र , काम निवडताना त्याचा सारासार विचार आधीच करावा.त्यातुन होणार फायदा - तोटा खर्च या सर्वांच गणित वेळीच करावं.एखादी गोष्ट मनाला खूप भाऊन जाते , यश शिखरावर मार्गक्रमण करताना प्रेम , भावना , वैयक्तिक जिव्हाळा यांना स्थान न देता कार्यक्षमतेच्या जोरावर बौद्धीक पातळीनुसार आपण आपल्या कार्यक्षेत्रात नक्की यशस्वी होऊ शकतो.बहुतेकदा छोठयाश्या पराभवाने आपण पुर्णतः खचुन जातो आणी येथुनचं आपल्या उद्दोगव्यवसायाच्या , कार्यक्षेत्राच्या अधोगतीस सुरवात होते.सर्वप्रथम आपण आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवावा , तेव्हा कुठे लोक आपल्यावर विश्वास ठेवुन सन्मानाची वागणुक देतील.
Copyright@
✍🏻....तुषार उत्तमराव दाभाडे.
टाकळीभान ता.श्रीरामपुर
जि. अहमदनगर मो.9960923377
टिप्पण्या