नाती

*एक छोटा  मुलगा  आपल्या दोन हातात दोन पेरू घेऊन उभा असतो ,त्याची  ताई  हसतहसत म्हणाली,"दादा एक पेरु मला दे". तेवढ्यात त्याने  तो पेरू दाताने कुरतडला.त्याची ताई काहीच बोलली नाही. मुलाने दुसरा पेरूही दाताने कुरतडला. आपल्या भावाची  ही कृती बघून त्याची ताई नुसती बघतच राहिली व तिच्या चेहऱ्यावरील हसू गायब झाले*. *तेव्हा तिच्या लहानग्या भावानेे चिमुकले हात पुढे करुन कुरतडलेल्या दोन्ही पेरूंपैकी एक पुढे केला व म्हणाला "ताई , हा घे.हा जास्त गोड आहे." ताईच्या डोळ्यात पाणी आले*. 😥😥😥
*प्रत्येक वेळी आपले निष्कर्ष बरोबर असतीलच, अस नाही*...
*एखाद्याची कृती पूर्ण होईपर्यंत घाईघाईत निष्कर्ष काढून गैरसमज करून घेण्यापेक्षा  ते गैरसमज दूर करण्यात आणि समोरच्याला समजून घेण्यातच मनुष्याचे हित असते*....               

  🛌🛏🛌?*शुभ रात्री🛏🛌🛏🛌

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट