कारण तू घरीच असते

छान आहे , वाचा बर का...
" कारण तु घरीच असते "

अग ऐकलंस का.......?
आज बंटीची बस येणार नाहीए.
मला वेळ नाही.
त्याला शाळेतुन तुच आण.
*कारण तु घरीच असते.....*

आग माझ चार्जर सापडत नाही,
battery low आहे,
तुझा फोन नंतर लाव.
तुझा चार्जर मला दे.
*कारण तु घरीच असते......*

आज मला लवकर office ला जायचे आहे ,
आधी पेपर मला दे.
तु नंतर कधीही वाच.
*कारण तु घरीच असते.....*

उद्या माझा boss येणार आहे.
पिंकीची exam आहे .
तिचा अभ्यास तुच घे.
*कारण तु घरीच असते......*

दोन/तीन दिवस खुप busy आहे .
Month end आहे.
आई - बाबांचे औषधे तुच आण.
*कारण तु घरीच असते ....*

बंटी-पिंकीची अंघोळ,
त्याचा डबा, माझा नाश्ता,
तयारी आधी करत जा.
तुझी घाई मधेच कशाला?
*कारण तु घरीच असते .....*

office मधे work load आहे.
मुलांच्या parents meeting ला
मला जमणार नाही.
तुच attend कर.
*कारण तु घरीच असते ....*

ए आई, remote दे.
मला TV बघायचा आहे.
नंतर मला class आहे.
तु नंतर बघ ना तुझी serial repeat.
*कारण तु घरीच असते .....*

आज colleague बरोबर
बाहेर जातोए जेवायला.
मुलांना तुच garden मध्ये नेउन आण.
*कारण तु घरीच असते .....*

पुण्याचे मामा-मामी येताएत लग्नाला.
मी तर office मधे असतो
पण त्यांना म्हटलं उतरा आमच्या कडे.
*कारण तु घरीच असते ....*

मुले शाळेतुन आल्यावर आज पावभाजी कर.
पिंकीचा वाढदिवस आहे न!
आराम तर रात्री ही होईल.
जमलस तर cake पण कर.
*कारण तु घरीच असते ....*

अग ऐकलस का ?
खुप दमुन आलोय.
एक कडक चहा दे आणि
जेवायलाही लवकरच वाढ.
होईल न स्वयंपाक पटकन ?
*कारण तु घरीच तर असते....*

घराबाहेर पडणाऱ्यांची
प्रत्येक गोष्ट प्रथम महत्त्वाची.
'ति'च्या प्रत्येक इच्छेला,
प्रत्येक  आवडीनिवडीला दुय्यम स्थान !!
*कारण 'ती' घरीच असते.*

खरंच का एवढ सोप्प आहे ?
*घरी राहण ??????*

मनाला भावलेली एक हळवी पोस्ट 💕
सगळ्यांसाठी 🙏
*समजून घ्या ,उमजुन घ्या .....*
*स्रियांचा सन्मान करायला शिका....*

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट