वरून राजावर कविता
येणं बावा पावसा !
तू काव्हून रूसला...
का ? देवेन्द्रसारखाच
तू बी निकष लावत बसला...
शेतकऱ्यावरच काव्हून तू
सरसकट कोपते...
तत्वत: तरी बरस राजा
कोठं जाऊन झोपते ..?
काहींची झाली पेरणी,
काही हाये थांबून...
अच्छे दिना सारखाच ,
तू बी राह्यला लांबून...
काळे- पांढरे ढगं आणून
काह्यले आम्हाले झुलवते...
जसे शब्दाच्या खेळात,सरकार
सुकाणू ले भुलवते...
अरेsss वरीसभऱ्याचं पिक
आमच्या, हातचं चाल्ल जाईन....
कर्जमाफीवर बोलता बोलता
नेते नास्त्यात का खाईन...?
अरे आमच्यासाठी नोको बरसू
हवामान खात्यासाठी बरस...
अब्रू जाऊन राहीली त्यायची, लेका
खा, त्यायच्या वरती तरस...
-------*****-------
....
-------*****---------
टिप्पण्या