EMI बद्दल थोडे
👉 _*...म्हणून ईएमआयबाबात दक्ष रहा!*_
_*Lets Up Faide Ki Baat*_
ईएमआयमुळे अशक्य वाटणारी खरेदी शक्य झाल्यामुळे सर्वसामान्यांचे जीवन सुसह्य झाले आहे. परंतु ईएमआयचा ओव्हरडोस आपल्या आर्थिक विवंचनेत भर पाडू शकतो. विवाहापूर्वी आणि विवाहानंतरच्या स्थितीत होणारे बदल, कुटुंबाचाचा खर्च, मुलांचे शिक्षण, लग्नसमारंभ यासाठी करावी लागणारी तरतूद याचा विचार करणे अपरिहार्य ठरते. ईएमआय ही अशी गोष्ट आहे की, ती आपल्या समाधानी जीवनात अस्थिरता निर्माण करते. ईएमआयच्या अधिक आहारी न जाता आहे ते कर्ज किंवा ईएमआय योग्यरितीने कसे पूर्ण करता येईल, याकडे दक्ष राहणे आवश्यक आहे.
👉 _*सातत्यपूर्ण विश्लेषण*_ : कर्ज किंवा ईएमआय हे एखाद्या कोलोस्ट्रॉलप्रमाणे आहे. त्याचा समतोल बिघडला तर त्याचे चांगले किंवा वाईट परिणाम होतात. शरिरातील कोलॉस्ट्रॉलची स्थिती चांगली राहिली तर प्रकृती चांगली राहते. त्याचे प्रमाण आवाक्याबाहेर गेले तर शरिरावर दुष्परिणाम व्हायला सुरूवात होते. याचाच अर्थ असा की कर्ज किंवा ईएमआय मर्यादित प्रमाण असेपर्यंत आर्थिक स्थितीत फारसा फरक पडत नाही.
जर त्याचे प्रमाण वाढले तर आर्थिक गणित चुकायला लागतात. त्यासाठी आपल्या गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज किंवा अन्य वस्तू खरेदी करताना स्विकारलेल्या ईएमआयचा आढावा, विश्लेषण सातत्यपूर्ण घ्यायला पाहिजे. त्यातून आपल्याला आर्थिक नियोजन करणे सोपे जाते. अचानक उद्भवणारा खर्चसुद्धा ईएमआयवर परिणाम करणारा ठरू शकतो. त्यामुळे आपत्कालिन स्थितीसाठी पैसे बाजूला काढून ठेवण्याची काळजी घ्यायला हवी.
👉 _*चांगला किंवा वाईट ईएमआय*_ : आपल्या हातात 50 हजार वेतन पडत असेल तर त्यापैकी आपला कर्जाचा हप्ता 20 ते 25 हजार असेल तर आपण बॉर्डरलाईनवर आहोत, असे समजावे. आपल्याला एकूण हातात पडणार्या रकमपैकी 50 टक्के रक्कम एवढा ईएमआय असावा. ही कर्जस्थिती काहीप्रमाणात आदर्श मानली जाते. परंतु आपल्यावर आर्थिक बोझा असताना कर्ज घेण्याचे शक्यतो टाळले पाहिजे. अकारण कर्ज घेऊन आपण स्वतःच्या पायावर कुर्हाड मारून घेण्यासारखे ठरू शकते. बाजारात सेल आहे किंवा ऑफर आहे म्हणून त्याला बळी पडून आपण सुलभ हप्त्याची सुविधा स्विकारत वस्तू खरेदी करणे ही बाब धोक्याची घंटा ठरू शकते.
घराच्या किंमती आवाक्याबाहेर गेलेल्या असताना आपण त्या खरेदीचा आग्रह करणे आर्थिक नियोजनावर पाणी फेरण्यासारखे आहे. त्यानंतर सुरू होणारे हप्ते आपल्यावरचा आर्थिक ताण भर घालणारे ठरू शकते. जर आपल्याला चांगला परतावा मिळणार असेल तर वेळी कर्ज काढून खरेदी करणे कधीही चांगले ठरू शकते. घराच्या वाढत्या किंमती लक्षात घेता ती वस्तू खरेदी करून काही वर्षात ती विकून त्याचा चांगला लाभ मिळत असेल तर अशा वेळी धाडस दाखविणे योग्य ठरू शकते. भविष्यात चांगला परतावा मिळणार्या गोष्टी घेण्यास हरकत नाही, परंतु ज्या वस्तूंची किंमत कालांतराने कमी होणार आहे, अशांसाठी ईएमआय किंवा कर्ज उचलू नये आणि खरेदी जरी केली तरी त्याचा ईएमआय कमी कसा राहिल, याचा विचार केला पाहिजे.
👉 _*परवडणार मुद्दे*_ : आपण दोन गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. एक म्हणजे परवडणारे कर्ज आणि परवडणार हप्ता. दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. आपण परवडणारा हप्ता काही महिन्यांसाठी किंवा काही वर्षांसाठी घेऊ शकतो. परंतु कर्जाबाबत असे करता येत नाही. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास 28 ते 30 लाखांच्या कर्जासाठी 30 हजाराचा हप्ता भरावा लागतो. परंतु या हप्त्याची मुदत 20 ते 25 वर्ष इतकी असेल तर आपल्याला विचार करावा लागेल.
कारण कालांतराने आपल्या खर्चात वाढ होत राहते आणि कर्जाच हप्ते मात्र दिर्घकाळ सुरू राहतात. उत्पन्न जरी वाढले तरी महागाईही भडकत असते. त्याचा परिणाम आपल्यावरचे आर्थिक ओझे वाढत जाते. जर आपण ईएमआय आधिक ठेवला आणि कालावधी कमी ठेवला तर तो हप्ता आज आपण सहज पेलू शकतो. हा एकप्रकारे भविष्यातील संभाव्य बचतीचा मार्ग असू शकतो.
सौजन्य : लेट्स उप डिजिटल मॅगझिन
टिप्पण्या