पॅनकार्ड सोबत आधार कार्ड जोडण्यासाठी
👉 _*आधारकार्ड व पॅनकार्ड जोडण्यासाठी...*_
पॅनकार्डधारकांनी आधारकार्ड जोडून घेणे आवश्यक असल्याचे फर्मान केंद्र सरकारने सोडले आहे. ज्यांचे पॅनकार्ड 1 जुलै पूर्वी आधारकार्डशी जोडले जाणार नाही, ते 1 जुलैनंतर ग्राह्य धरले जाणार नाहीत. यादरम्यान जर पॅनकार्ड रद्द झाले तर, गेल्या आर्थिक वर्षातील कर तुम्हाला भरता येणार नाही. तसेच, परताव्यासाठी अर्जही करता येणार नाही.
केंद्र सरकारच्या आदेशनानंतर सर्वांची धावपळ सुरु झाली आहे पण अनेकजणांच्या आधारकार्ड आणि पॅनकार्डवर नावात बदल किंवा स्पेलिंग मिस्टेक आहेत. यामुळे आधारकार्ड व पॅनकार्ड एकमेकांना जोडण्यास अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे दोन्हीपैकी एक कार्ड बदलून घेण्याचा पर्याय सुचविण्यात आला होता. मात्र, प्राप्तिकर विभागाच्या वेबसाइटवर आधारकार्ड व पॅनकार्ड जोडण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे दोन्ही कागदपत्रांवरील नावे वेगवेगळी असली तरी ती एकमेकांना जोडता येणार आहेत. त्यासाठी काय करावे त्यावर एक नजर...
👉 सर्वप्रथम प्राप्तिकर खात्याच्या http://incometaxindiaefiling.gov.in/ या वेबसाइटवर जा.
👉 Services वर क्लीक केल्यांनतर तेथे तुम्हाला Link Aadhar हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
👉 समोर दिसणारे पेज उघडल्यानंतर PAN आणि Aadhaar क्रमांकाच्या पर्यायानंतर आणखी एक पर्याय दिसेल. Name As Per AADHAAR येथे आधार कार्डप्रमाणे नाव टाइप करा.
👉 त्यानंतर CAPTCHA CODE भरा आणि LINK Aadhaar वर जाऊन SUBMIT करा.
👉 यानंतर तुमचे आधारकार्ड व पॅनकार्ड जोडले जाईल.
टिप्पण्या