सोशल मीडिया आणि जीवन

आयुष्य झालंय Busy तरी 
नात्यांमध्ये अजूनही 'ओढ 'आहे...
कोणी दाखवत उघड उघड 
काहींचा Silent mode आहे...
बरीच एकटी मनं आज 
Mobile मुळे रमतात....
न भेटताही गप्पांचे अड्डे , Whatsapp कट्ट्यावर जमतात..
दूरदेशी गेलेल्या मुलाशी 
'Skype' मुळे chat होतो..
विरहाच्या दुःखाचा 
एक क्षणात Format होतो...
हजारो मैलांची अंतरे, 
एका बटनाने मिटतात,
गणपती,दिवाळीला भेटणारे 
भाऊ -बहीण, 
रोज 'Group' वर भेटतात...
शाळा संपते अन 
मित्र-मैत्रिणींच्या 
आठवणींना पूर येतो....
Facebook वर 
एका search ने 
हाही Problem दूर होतो...
काही समस्या 
Upload करताच, 
Solution सहज 
Download होतं...
कठीण वाटणारं 
आयुष्याचं कोडं 
सहजपणे 'Decode' होतं...
Internet च्या जाळ्यामुळेच 
आपण दूर असूनही 
'Close' आहोत...
भेटू वर्षातून 
एकदा कदाचित 
पण सोबत 'Online' 
रोज आहोत....

😉😉😉😉😉

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट