खोले बाईंची माहिती

कालपासून खोले बाईच्या प्रकरणावरून बरच विचारमंथन घडतंय! स्वतःला उच्चवर्णीय समजणारे बरेचजण कालपासून  जमिनीवर आलेत  !  महाराष्ट्रातील शहाण्णव कुळी, ब्यान्नव कुळी ,आकरामाशी, बारामाशी, पंचकुळी, सप्तकुळी, गढीतले ,माडीतले, घाटाखालचे ,घाटावरचे पाटील, देशमुख, वतनदार, जहागीरदार हे सर्वच मराठे शुद्रच असल्याच दाखवून दिल्याबद्दल एकप्रकारे खोले बाईचे आभारच मानावे लागतील !  तीन आपल्याला जाणीव करून दिली ब्राम्हणी धर्मानुसार मराठा हासुद्धा शुद्रच आहे  नाहीतर आम्ही स्वतःला छत्रपती समजत होतो ! स्वतःला उच्चवर्णीय क्षत्रिय आहोत असं समजणाऱ्या मराठा समाजास जाग केल्याबद्दल खोले बाईंच  पुनश्च अभिनंदनच !  आम्ही एवढे दिवस झालं ओरडून सांगतोय ब्राम्हणी धर्मानुसार मराठा हा शुद्रच आहे ! पण डोळ्यावर जातीयतेची पट्टी पडलेला समाज ऐकायला तयारच नव्हता आज कमीतकमी फेसबुकड़े तर जवळ आले या प्रकरणामुळे ! बाकी जगतगुरु तुकाराम महाराजांच्या खून !  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध व त्यांच्यावर विषप्रयोग ! छत्रपती संभाजी राजेंची मनुस्मृतीप्रमाणे केलेली हत्या ! सावित्रीमाई फुलेंवर शेण ,माती व चिखल फेकणार असोत ! महात्मा फुलेंच्या घरासमोर मेलेली गाढव फेकणारे असोत !   राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना वेदोक्त प्रकरणात अडकविणारे असोत किंवा काल परवा दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी , गौरी शंकर यांच्या हत्या करणाऱ्या सनातनी प्रवृत्ती एकच आहे ! अन यांच्या उत्पन्नाचं मुख्य स्तोत्र आहे मंदिरातुन मिळणार बेसुमार उत्पन्न ! त्यांची रसद तोडायचीच असेल तर सत्यनारायण, वास्तूशांती, कालसर्पयोग नारायण नागबळी किंवा कोणतंही धार्मिक कार्य यांच्या हातून करणं बंद करा ! कारण गुलाम अन गुलामी लादणाऱ्यांचा धर्म एक असूच शकत नाही ! म्हणूनच तथागतांनी जगाला बौद्ध धम्म दिला ! महात्मा बसवश्वरांनी लिंगायत, महात्मा फुलेंनी सत्यशोधक  तर बाबासाहेबांनी धम्मपरिवर्तन केलं !  तर आदरणीय खेडेकर साहेबांनी आपल्याला शिवधर्म दिला ! त्यामुळे माणसा माणसात भेद करणाऱ्या धर्माला  सरसकट तिलांजली देऊन भारतीय बनऊयात !
होय भारतीय हाच आमचा धर्म भारतीयत्व हेच आमच राष्ट्रीयत्व अन भारतीय संविधान हाच आमचा धर्मग्रंथ !

जय जिजाऊ !
जय शिवराय!!
जय भारत !!!!!
जय संविधान!!!!!!

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट