महाराजांचा किस्सा
एकदा एका ठिकाणी दशक्रिया विधी चालु असतो .लोक अाजुूबाजूला
बसलेली असतात .घरचे लोक रडतच मेलेल्या माणसाबद्दल चांगले बोलत असतात .शेजारीच न्हावी वारसाची डोकी भाद्रत असतो .एका पत्रावळीवर
चार पाच भाताचे गोळे ठेवलेले असतात.
आणी तेवढ्यात एक फाटके कपडे घातलेला एकदम मळकट असा दाढी वाढलेला वयस्कर माणुस तिथ येतो आणी भटजी कडे विनवणी करतो की
मला खूप भूक लागली आहे .दोन दिवस झाले पोटात अन्नाचा कण नाही
माझ्यावर दया करा आणि समोर ठेवलेल्या भाताच्या गोळ्यातील एक गोळा मला द्या .हे ऐकुन भटजी संतापतो.भटजीच बोलण ऐकून लोकही त्या म्हाताऱ्या माणसाच्या अंगावर जातात पण अगदी मळकटलेला आणि भिकारी दिसतोय म्हणून त्याला हाकलून देतात.
तरी पण तो माणूस परत विनवणी करतो.
आहो दोन दिवस उपाशी आहे, धर्म करा आणि एक गोळा द्या या गरीबाला.
त्यावर भटजी म्हणतो यातील एकही गोळा तुला देता येणार नाही .कारण हा भात म्हणजे जो दहा दिवसांपूर्वी मेला आहे त्या साठी त्याला द्यायचा आहे.
म्हातारा तरी ऐकेना
म्हातारा म्हणतो तो माणूस आता कुठे आहे. त्यावर भटजी म्हणतो स्वर्गात. लोकही तेच बोलतात.
मग म्हातारा म्हणतो
स्वर्ग कुठे आहे.
भटजी म्हणतो खूप लांब आहे आणी हे बोलून सगळे जण त्या म्हातार्याला हाकलून देतात.
(दशक्रिया विधी नेहमी ओढ्याच्या किंवा नदीच्या काठावर करतात) मग तो म्हातारा शेजारी असलेल्या नदीच्या पाण्यात उतरतो आणि नदीतील पाणी बाहेरच्या जमिनीवर हाताने फेकतो.
सुरुवातीला कुणी लक्ष देत नाही पण बराच वेळ झाल्यावर भटजीसह सगळे जण विचारतात
ये म्हातार्या अरे काय काय वेड लागलय का काय तुला ?
हे काय करतोय?
त्यावर तो म्हातारा दाढी खाजवत म्हणतो
"बाप्पा हो यंदा दुष्काळ पडलाय आणि शेताला
पाणी नाही म्हणून पाणी देतोय. ..
लोक म्हणतातं कुठे आहे शेती तुझी
म्हातारा म्हणतो
अमरावतीला
लोक म्हणतातं कुठे आहे
अमरावती?
म्हातारा म्हणतो
खूप लांब आहे अमरावती
लोक आणि भटजी सगळे त्याला हसुन म्हणतात
"आरे वेड्या इथून टाकलेले पाणी इथेच तर पडतेय आणि कसे तुझ्या शेताला पाणी मिळेल .
यावर म्हातारा म्हणतो
इथ ठेवलेला भात जर मेलेल्या माणसापर्यंत हा
भटजी पोचवत असेल तर
मी टाकलेल पाणी माझ्या
शेताला का मिळणार नाही?
हे ऐकल्यावर सगळे लोक चक्रावून जातात. हा भिकारी नसुन कुणीतरी अवलिया आहे हे मान्य करुन त्या म्हातार्याच्या
पायावर डोकं ठेवतात.
हा म्हातारा दुसरा तिसरा कुणी नसुन अमरावती जिल्ह्य़ातील डेबुजी झिगंराजी जानोरकर
एकही दिवस शाळेत न
गेलेला महान विज्ञानवादी संत गाडगेबाबा हा होता .वैज्ञानिक विचार करायला शिक्षण लागतेच असे नाही तर आपल्या डोक्यातील
मेंदु गहाण न ठेवता स्वतंत्र असावा लागतो.
म्हणूनच म्हणते दैववादी होण्या पेक्षा विज्ञानवादी
व्हा नाहीतर पुढच्या पिढ्या या कायमच गुलाम आणि दरिद्री राहतील
टिप्पण्या