बँकांला 1 लाख कोटी ऐवजी 2 लाख कोटी मोदींकडून

अखेर लाखो रोजगार निर्मितीचं ब्रह्मास्त्र मोदींनी बाहेर काढलंच। कंगाल झालेल्या सरकारी बँकांना अपेक्षा होती एक लाख कोटींच्या पॅकेजची, मोदींनी त्यांना 2.11 लाख कोटींचे घसघशीत पॅकेज जाहीर करून मरगळलेल्या बँकिंग क्षेत्रात खळबळ उडवून दिलीय। आज सकाळीच शेअर बाजार उघडला तोच मुळी सरकारी बँकांमध्ये 20 ते 35% च्या तेजीने। त्यामुळे लाखो गुंतवणूकदारांची अक्षरशः चांदी झाली।

बँकिंग क्षेत्राबरोबरच पायाभूत क्षेत्रासाठी तब्बल 6.9 लाख कोटी खर्चून 83877 किलो मीटरचे महामार्ग उभारले जाणार असून त्यामुळे देश भरात लाखो रोजगार निर्माण होणार आहेत।

बुडीत खात्यात गेलेल्या प्रचंड रकमेमुळे सरकारी बँका मार्च 2015 पर्यंत केवळ 2 लाख 78 हजार कोटीच बुडल्याचं बॅलन्स शीटमध्ये दाखवत होते। मोदी सरकार सत्तेवर आलं तेव्हा जून 2015 मध्ये हि रक्कम 7 लाख 33 हजार कोटी असल्याचं आढळलं। त्यातील 5 लाख कोटी तर रिकव्हरी अशक्य कोटीत गणली गेली होती। त्यामुळे आर्थिक दृष्ट्या डबघाईला आलेल्या सरकारी बँका छोट्या मोठ्या उद्योजकांना कर्ज देताना हात आखडता घेत होत्या। पर्यायाने नव्या नोकऱ्या निर्माण होत नव्हत्या। नवे उद्योजकहि तयार होत नव्हते। मोदी सरकारच्या आर्थिक पॅकेजमुळे आता बँका मोठ्या उत्साहाने उद्योजकांना आर्थिक रसद पुरवठा करतील। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर उद्योग विस्तार तर होईलच पण लाखो नवउद्योजकाना बँकेकडून कर्ज उभारून लहान मोठे रोजगार निर्माण करता येतील।

पायाभूत सुविधा म्हणजे अर्थ व्यवस्थेचा कणा मानला जातो। देशातील किंवा परदेशी कंपन्या पायाभूत सुविधा बघूनच आपली गुंतवणूक करतात। त्यामुळेच संपूर्ण देशात 6.9 लाख कोटी खर्च करून येत्या 5 वर्षात महामार्ग उभारले जातील, ज्यामुळे रस्त्याचं काम सुरु झाल्याबरोबर लाखो रोजगार निर्मिती होईलच पण अनेक कंपन्या त्या मार्गावर आपले प्रकल्प उभारून आणखी लाखो लोकांना रोजगार देतील।

बंधू भगिनींनो, बँकांना अपेक्षा होती एक लाख कोटी पॅकेजची। अशा वेळी मोदींनी 2 लाख कोटी पॅकेजची ऑफर करून सर्वाना जबरदस्त धक्का दिलाय। कारण बुडीत खात्यात गेलेल्या त्या 5 लाख कोटीपैकी 2 लाख कोटींची रिकव्हरी आपण करूच करू हा मोदींना पूर्ण विश्वास आहे। ज्याच्याकडे प्रचंड आत्मविश्वास आहे तो माणूस आयुष्यात यशस्वी होतोच हा जगाचा इतिहास आहे। एकदाच स्वतःला विचारून पाहा- तुमच्याकडे असा आत्मविश्वास आहे का। जर असेल तर जगातील कुठलीही शक्ती तुम्हालाहि यशस्वी होण्यापासून रोखू शकणार नाही।

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट