संविधान
संविधान
गीता बायबल कुराणाचा
रात्री कोर्टात रंगला वाद ।
टेबलावरच्या संविधानाकडे
जो तो मागत होता दाद ॥
बायबल म्हणाला मी मोठा
माझा जगात वाजे डंका ।
पण धर्मांतराची यादी वाचून
आली संविधानाला शंका ॥
गीता म्हणाली माझा निर्माता
साक्षात भगवान श्रीकृष्ण ।
पण साक्षीदार हजर नव्हता
तेव्हा उभा राहिला मोठा प्रश्न ॥
मै बडा मै बडा असं म्हणत
कुराणाने मांडली स्वतःची बाजु ।
पण उलट तपासणी होताच
न्यायाचा हलू लागला तराजू ॥
दंगलीची फाईल उघडताच
कुराणाला फुटला घाम ।
गीता आपल्या मनामध्ये
आठवू लागली राम ॥
अनुयायींचा विषय निघताच
सारे मोडू लागली बोटं ।
म्हणाले आमच्यावर हात ठेवून
ते खुशाल बोलतात खोटं ॥
संविधानाने सर्व बाजु ऐकून
विचार केला बारीक ।
पुढील ठोस निर्णयासाठी
त्यांना दिली पुढची तारीख ॥
शेवटी भांडणात धर्मग्रंथाच्या
बघता बघता पहाट झाली ।
आणि सर्व धर्माची माणसे
न्याय मागायला कोर्टात आली ॥
न्यायाधीश बसले खुर्चीवर
आणि सुरू झाले खटले ।
पण आपल्यापेक्षा संविधान मोठे
हे सर्व धर्मग्रंथाना पटले ॥
🙏🙏
टिप्पण्या