मोदी आणि रोजची वाढती महागाई
सध्या मोदी सरकार व महागाई विरुद्ध एक पेव फुटलय .अशा post पाहून शिवरायांच्या जीवनातील एक प्रसंग आठवला. ऱायगडाचे बांधकाम चालु होते ; दुष्काळ पडला होता , मजुरांना द्यायला मजुरीचे पैसे नव्हते. त्यांच्या अंतरातलि हालचाल टिपण्यासाठी महाराजांनी एकाला पाठविले . त्याने त्यांना भडकवायचा बराच प्रयत्न केला ; शेवटि त्यांच्यातला एक मजुर म्हणाला," आम्ही आमच्या राजाला चांगले ओळखतो ; आम्हाला पुरेशी मजुरी न देता येण्याचे दु:ख त्यांना नक्किच असेल आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आम्हि मजुर नाहि स्वराज्याचे भागीदार आहोत आम्हि जे करतोय ते आमच्या पुढच्या पिढ्यांना कामात येईल" खरच , स्वराज्य उभा करायला नुसते शिवाजि नाहि तर मावळे देखील लागतात ; देश भयंकर आर्थिक मंदितुन जात असताना व आत बाहेरचे अनेक शत्रू टपुन बसलेले असताना मोदि सारख्या प्रामाणिक नेत्यावर जि जनता अविश्वास दाखविते आहे त्याना काय कळणार स्वराज्य व स्वातंत्र्याची किम्मत ? दुर्दैव या देशाचे कि दारुपायि हजारो रुपये उडविणारे महागाईच्या नावाने गळा काढतात. जपान वर अणु हल्ला झाल्यावर ऊध्वस्त झालेल्या देशाने त्यातुन बाहेर येण्यासाठी तिथल्या नागरिकांनि ठरविले आपण फक्त सहाच तासांचा पगार घ्यायचा व दोन तासाची कमाई देशाला द्यायची . परिणाम हा आहे कि भारतासारख्या देशाला एक लाख कोटींचे कर्ज आज जापान देतोय . देवा कधि जाग येईल माझ्या देशाला🤔
टिप्पण्या