मुला मुलींचे वाढते वय आणि समस्या
खरे आहे.
आज समाजातील बरेचसे तरूण,तरूणी यांना गुणवत्ता व व्यावसायिक शिक्षण या अभावी खाजगी वा सरकारी नोकर्या मिळू शकत नाही.सुरवातीला तुटपुंज्या व कमी पगारावर नोकरी करून अनुभव घेवून नोकरी करीत नाही.(स्ट्रगल करावा लागतो हेच त्यांना व त्यांच्या पालकांना कळत नाही.)
यामुळे वय वाढत जाते.
शिक्षण वा नोकरीमुळे पालकांच्या अवाजवी अपेक्षा वाढतात.खाजगी , जरी चांगली नोकरी असली तरी असे मुलाचे स्थळ नको असते.जर असली तर कमीत कमी 30—40 हजाराची नोकरी असावी.कमी शिकलेला नको.तो स्वतंत्र एकटा रहाणारा असला पाहिजे,शक्यतो स्वत:चे घर असले पाहिजे.अशा अनेक वधूपित्यांच्या अपेक्षा असतात.
तर मुलेही नोकरीवाली वा नोकरी करू शकणारी , उच्चशिक्षित असावी.सुंदर व गोरी असावी.वधूपित्याची आर्थिक स्थिती चांगली असावी.अशा अपेक्षा असतात.
ह्या अपेक्षांमुळे वये वाढत आहेत.
तडजोड व परस्परावरील विश्वास हा संसाराचा पाया आहे,हेच आजची मुलेमुली व त्यांचे पालकही विसरतात.आजकाल क्षुल्लक गोष्टींवरून ' ईगो ' करून मुलेमुली व त्यांचे पालक संसार बिघडवून टाकण्याचे प्रमाण वाढत आहेत.
whatsup facebook instagram अशा अॅपमुळे मुलामुलींचा अविश्वासामुळेही संसारात खटके उडत आहेत.एकमैकांना पासवर्ड देत नाहीत.मोबाईलला हात लावू देत नाहीत.परस्परांवर अविश्वास दाखविला जातो.बाॅयफ्रेंड व गर्लफ्रेड चे प्रमाण वाढत आहेत.त्यांचे चुकीचे सल्लेही संसाराला विनाशक ठरत आहेत. ह्यामुळे फारकतीचे प्रमाण वाढत आहेत.असा निष्कर्ष टाटा सामाजिक मूलभूत संशोधन संस्था ह्यांनी काढला आहे.शिवाय मुले मुली आर्थिक स्वावलंबन व लग्नाचे वय उलटून गेल्याने व प्रौढावस्था प्राप्त झाल्याने एकएकटे राहण्याची प्रव्रूत्ती वाढत चालली आहे.असेही अहवाल सांगतो
यातच 498 a सारख्या कायद्यामुळे मुलांना व त्यांच्या पालकांना धमक्यांचे व ब्लॅकमेलींगचे प्रमाण वाढत आहेत . सुप्रिम कोर्टाच्या अहवालानुसार 92% केसेस खोट्या असल्याचे दिसून आले असल्याने 498a मधे बदल करून पुरूषांच्या संरक्षणाच्या बाबतीत 498 b चे कलम टाकण्यास सांगितले आहे.
पूर्वी लग्न जुळविण्या कामी दोन्हीकडील परिवार,भाऊबंद एकत्र येत,सल्ला घेत.आता तसे होत नाही.लग्न मोडतील किंवा आम्हाला त्यांची गरज नाही वा त्यांच्याशी शहरात राहण्यामुळे संपर्क नसणे.यामुळे एकत्रित येत नाहीत.ह्यामुळेही आता कोणी हस्तक्षेप करीत नाहीत.त्यामुळेही लग्ने लवकर जमत नाहीत.
ह्यामुळे समाजस्वाथ्य बिघडत चालले आहे.मुलामुलींची वाढती वये ह्यामुळे पालकांना झोप लागत नाही.
ह्यातून आजच्या सुशिक्षित समाजाने मार्ग काढला पाहिजे.नाही तर आपले अडाणी पूर्वज चांगले होते.असे म्हणायची पाळी आली आहे.
टिप्पण्या