घर आणि घरातील माणसे
राचे घरपण हे त्या घरातील स्त्रिमुळे टिकून असते आणि 👨🏽👨🏽👨🏽✈कोणत्याही पुरूषाचा प्रपंच
हा त्याच्या पत्नीच्या योग्य साथीमुळेच वाढत आणि घडत असतो .
हे सर्वमान्य सत्य आहे तरीही आज अनेक घरात स्त्रिला दुय्यम स्थान आहे .
💆🏻 स्त्रिशिवाय घर हे घरच रहात नाही.
💆🏻 ज्या घरातील ती गेलेली आहे , तेथे जाऊन पहा किंवा त्या घरातील सदस्यांना तिची किंमत विचारा आणि 👨🏽👨🏽👨🏽✈ज्याच्या जीवनातील अर्धांगीनी गेलेली आहे , त्याला तिची खरी किंमत विचारा.
🔴🔅ती असेल तर प्रत्येक ठिकाण स्वर्ग आहे आणि 🙈ती नसेल तर स्वर्ग सुध्दा नरक आहे, तरीही 🤦🏻♀आपण तिला नेहमी टिंगलीचा आणि विनोदाचा विषय बनवतो💆🏻, हा कोणता पुरूषार्थ आहे?
ज्या पुरूषांनी आपल्या धर्मपत्नीला अर्धांगीनीचा खरा दर्जा आणि सन्मान दिला ते असामान्य घडलेले आहेत.
😍 💑 महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनातील वेणूताईंचे स्थान पहा . त्यांनी आपल्या पत्नीला लिहिलेली पत्रे एकदा वाचा आणि वेणूताईंच्या मृत्यूनंतर किती दिवसात हा बलाढ्य राजकीय योध्दा कोसळला ? हेही एकदा वाचा .
अर्धांगीनीशिवाय ज्याला जगता येत नाही.
🔴🔅 त्याची पत्नीच खरी अर्धांगीनी आहे ,
😡 बाकीच्यांची फक्त बायको असते.
💑 छत्रपती संभाजीराजांच्या जीवनातील येसूबाईंचे स्थान ,
💑 शिवरायांच्या जीवनातील सईबाईंचे स्थान आणि
💑 राजे शहाजीमहाराजांच्या जीवनातील माँसाहेब जिजाऊंचे स्थान आपल्या डोळ्यासमोर आणा.
या सर्व स्वकर्तुत्वाने महान होत्याच पण त्यांच्या पतींनी त्यांना दिलेला दर्जा आणि सन्मान यामुळेच त्या अतिमहान झाल्या आहेत आणि इतिहासात सुर्यासारख्या तळपत आहेत.
🤦🏻♀कल्पना करा या पुरूषांनी जर त्यांना विनोदाचा आणि टिंगलीचा विषय बनवला असता तर काय झाले असते ?
🙈 पत्नी माहेरी गेली तर खूष होणारे,
🙈 उठसुट तिच्यावर टवाळ विनोद करणारे,
🙈तिला फसवून लफडी करणारे
यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की हे सर्व तिला माहीत असते आणि समजतही असते, तरीही ती शांत असते हा तिचा बावळटपणा किंवा मूर्खपणा नसून तिची सहनशीलता आणि असामान्य सय्यम आहे.
👨🏽👨🏽👨🏽✈ घरातील पुरूष गेला तर स्त्रि आपले दुःख बाजूला ठेऊन पुरूष बनते आणि घर पुन्हा उभे करते आणि घराचा कणा बनते,
💆🏻सर्वांना मायेची सावली देते, लेकरांना उभारी घेण्यासाठी त्यांच्या पंखात बळ भरते, पण
🔴🤦🏻♀ जर घरातील स्त्रि गेली तर पुरूष लेकरांना वाऱ्यावर सोडतो, दुसरी शोधतो, परीणाम घर मोडते, त्याला तेच घर पुन्हा उभा करता येत नाही, कारण त्याला कधीच स्त्रि बनता येत नाही, पण स्त्रित पुरूष बनण्याची क्षमता आहे.
🤦🏻♀ तिच्यावर विनोद करताना दहा वेळा विचार कर !
आपला पती गेल्यानंतर ज्या स्त्रिने आपले घर सावरले आणि पुन्हा उभे केले त्या सर्व आजच्या अहिल्यादेवी आहेत आणि त्या सर्व पुण्यश्लोक बनवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे .
💆🏻 आपल्या अर्धांगीनीची 💆🏻
कदर करा, आदर ठेवा आणि योग्य सन्मानाने तिला वागवा
टिप्पण्या