गुरूंचा आदर कसा करावा

💥💥संकीर्ण विषय💥💥

🌻दीक्षा घेतल्यावर सद्गुरूंजवळ कसे वागावे ?

🔅सद्गुरूंशी खोटे बोलू नये.
🔅फार बोलू नये.
🔅सद्गुरूंची निंदा करू नये.
🔅आपले बोलणे बरोबर नाही, असत्य आहे. या स्वरूपाचे शब्द तोंडात येऊ नये.
🔅गुरूंसमोर वेगळी पूजा  करू नये.
🔅मर्यादा सोडून वागू नये.
🔅दीक्षा वगैरे विषयावर  आपले प्रभुत्व दाखवणारे भाषण करू नये.
🔅सद्गुरूंचे आसन, अंथरुण, वस्त्रादि-कपडे, अलंकार, पादुका, चित्र इ. ना स्पर्श करून वंदन करावे.
🔅गुरू आज्ञा मोडू नये.
🔅सद्गुरूंना प्रत्युत्तर देऊ नये.
🔅दिवसा, रात्री, सदैव सेवकाप्रमाणे त्यांची आज्ञा पाळली पाहिजे.
🔅असत्य, अशुभ, वादविवाद इ. टाळावे.
🔅सद्गुरूंना न आवडेल असे करू नये.
🔅सद्गुरूकार्यात आळस करू नये.
🔅सद्गुरूकार्यात लौकिक इच्छा नसाव्यात.
🔅सद्गुरू कार्यात राग नसावा.
🔅सद्गरूंच्या डोळ्याला डोळा भिडवून कधीही बोलू नये.
🔅सद्गुरूंना नमस्कार केल्याशिवाय ओलांडून वा समोरून जाऊ नये.
🔅संपत्ती, जात किंवा आश्रम इ. चा अभिमान नको.
🔅सद्गुरूंसमोर अद्वैताची भाषा करू नये.
🔅सद्गुरूंसमोर देपूजाही करू नये.
🔅सद्गुरूंसमोर पलंगावर निजू नये व तसेच समोर हात पाय पसऱून बसू वये.
🔅आळस, अंगविक्षेप  समोर करू नये.
🔅जाता-येता स्दगुरूंच्या पादुकांना वंदन करावे.
🔅त्यांचे काम प्रसन्नतेने करावे.
🔅सद्गुरूंची सावली ओलांडू नये.
🔅त्यांचे पुढून तसेच जाऊ नये.
🔅अनवाणी जाऊन आधी  गुरुगृहाला वंदन करावे.
🔅सद्गुरूंसमोर आपला शिष्य-संप्रदाय  मिरवू नये.
🔅अहंकार करू नये.
🔅आपल्या गुरूंना त्यांच्या गुरूंसमोर नमस्कार करू नये.
🔅सद्गुरूंशी 'तुम्ही ' सर्वनामान न बोलता 'आपण '  सर्वनाम वापरून बोलावे.
🔅सद्गुरूंना वंदन करून त्यांचेजवळ बसावे.
🔅सद्गुरूंच्या आज्ञा घेऊन त्यांच्या जवळून जावे.
🔅सद्गुरूंसमोर काम, क्रोध, लोभ ,मान घेणे, हसणे, स्तुती करणे, कुटिलता दाखविणे,  ओरडणे, रडणे या गोष्टी करू नये.
🔅सद्गुरूंना ऋण देणे किंवा त्यांच्याकडून ऋण घेणे, त्यांना वस्तू विकत देणे या गोष्टी करू नये.
🔅सद्गुरूंच्या समाधानातून शिष्याला पूर्णत्व प्राप्त होते.
🔅सद्गुरूंच्या आठवणीत  सर्व देवतांचे स्मरण अंतर्भूत आहे.
🔅गुरू, गुरू-मंत्र आणि इष्टदेवता या तीन वेगवेगळ्या गोष्टी नसून एकच आहे असे समजावे.

*संदर्भ-१- श्री सद्गुरूसाधक सुसंवाद.

।।श्री गुरुदेव दत्त ।।
🌷🙏🙏🙏🙏🙏🌷

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट