जोक
घडलेला किस्सा...
एका घरात जुन्या भिंतीत कपाट करायचं चाललं होतं. भिंत फोडणं चालू होतं. अंधार होता. जुन्या भिंतीत काहीतरी असू शकतं म्हणून लोक सावध होते. आणि "खण्ण" आवाज झाला. मग हळूहळू माती बाजूला सरकवून, बॅटरीच्या प्रकाशात सगळे पहायला लागले. काहीतरी चकचकत होतं. माती बाजूला करून हळू ती वस्तू बाहेर काढली तर डबा होता. तो ही जुना पितळी . सगळे चकित. उघडून पाहिला तर आत फ्रेश चिवडा.
मग लक्षात आलं. तो बाजूच्या घरातल्या भिंतीत असलेल्या कपाटातला होता.
शेजारीण-- 😡😡
*आर तुमचा मूडदा बशिवला भित्ताडासंग*
😂😂😂😂😂😂😂
टिप्पण्या