जोक- विमल ची पुडी
_आॅस्ट्रेलिया खूपच महाग देश आहे._😟
_पण तिकडची सार्वजनिक सेवा महागडी असली तरी फार तत्पर आहे._
_एकदा एक औरंगाबाद मधून ऑस्ट्रेलियात स्थलांतरित झालेले कुटुंब सुटीनिमित्त प्रवास करीत होते. त्यांच्यासोबत औरंगाबादातुन गेलेले त्यांचे वडील देखील होते._
_गाडी हायवेवरून चालली होती. त्यांच्या गाडीमागून एक स्थानिक महिला गाडी चालवीत होती._
_पुढील गाडीच्या खिडकीतून अचानक एका वयस्क माणसाचे डोके बाहेर आलेले तिला दिसले. त्या माणसाला रक्ताची उलटी होताना तिने पाहिले._
_तिने आपल्या कॅमेऱ्यात हे बंदिस्त करून अत्यावश्यक सेवा मागवली._
_काही मिनिटातच हेलिकाॅप्टर हजर झाले. पुढच्या गाडीत पुढील सीटवर बसलेल्या दांपत्याला वडिलांनी काहीच सांगितले नव्हते._
_इतक्यात अँब्युलन्स समोर येऊन उभी राहिली. गाडी थांबवून काय होतं आहे ते_ _कळायच्या आत वडिलांना स्ट्रेचरवर झोपवून आॅक्सिजन चालू केला._
_या सेवांचे २० लाखावर बील त्या कुटुंबाला भरावे लागले ..._
_आणि हो..._
_महत्वाची गोष्ट म्हणजे *ती रक्ताची उलटी नव्हती तर विमल ची पूड़ी होती.*_
_बापाने विमल ची पूड़ी लपवून आणलेच कशी याचा शोध आता पोरगा घेतोय ..._🤣🤣😂
टिप्पण्या