कविता - बायकोला नाव
*हलकी-फुलकी , मजेशीर , एक चांगला मॅसेज देणारी प्रा. विजय पोहनेरकर यांची नो टेन्शन कविता 😃*
*जे नवरे आपल्या बायकोचा आदर करतात त्यांनी आपल्या स्वतःच्या बायकोला आवर्जून वाचून दाखवावी !*😃
*मला खात्री आहे बायका तर नक्कीच नवऱ्याला वाचून दाखवतील !😃*
*आणि खरंच या कवितेमुळे घरातलं वातावरण आनंदी झालं तर दोन शब्दांची पोच पावती द्यावी 😃!*
---------------------------------------------------*
*बायकोला नावं ठेवणे*
*हा गंभीर गुन्हा आहे !*
*कवी : प्रा. विजय पोहनेरकर*
---------------------------------------------------
*बायको जर नसेल तर*
*राजवाडा पण सुना आहे*
*बायकोला नावं ठेवणे हा*
*खरंच गंभीर गुन्हा आहे*
*खरं पाहिलं तर तीच्या शिवाय*
*पानही हालत नाही*
*घरातलं कोणतंच सुख*
*बायको शिवाय फुलत नाही*
*नौकरी अन पगारी शिवाय*
*नवऱ्या जवळ आहे काय ?*
*तुलनाच जर केली तर*
*सांगा तुम्हाला येतं काय ?*
*स्वच्छ , सुंदर , पवित्र घर*
*बायकोमुळे असतं*
*नवरा नावाचं विचित्र माणूस*
*तिलाच हासत बसतं*
*वय कमी असून सुद्धा*
*मुलगी समजदार असते*
*बायको पेक्षा नवऱ्याचे वय*
*म्हणून जास्त असते !*
*तिचा दोष काय तर म्हणे*
*चांगल्या सवयी लावते*
*कुटुंबाच्या कल्याणासाठी*
*दिवस रात्र धावते*
*चिडत असेल अधून मधून*
*सहनशीलता संपल्यावर*
*तुम्हीच सांगा काय होणार*
*चोवीस तास जुंपल्यावर*
*बायकोची टिंगल करून*
*फिदी फिदी हासू नका*
*तिच्या यादीत मूर्ख स्थानी*
*नंबर एक वर बसू नका*
*बायको म्हणजे अंगणातला*
*प्राजक्ताचा सडा*
*बायको म्हणजे पवित्र असा*
*अमृताचा घडा*
*बायको म्हणजे सप्तरंगी*
*इंद्रधनुष्य घरातलं*
*देवासाठी गायलेलं*
*भजन गोड स्वरातलं*
*नवरोजी बायकोकडे*
*माणूस म्हणून पहा*
*तिचं मन जपण्यासाठी*
*थोडं शांत रहा*
*कधीतरी कौतुकाचे*
*दोन शब्द बोलावत*
*तिच्या वाट्याची दोन कामं*
*आनंदाने झेलावेत*
*बायकोचं कौतुक करणं म्हणजे*
*नवरे वाईट नसतात*
*कधी कधी विनाकारण*
*टिंगल करत बसतात*
*प्रा. विजय पोहनेरकर*
*9420929389*
*औरंगाबाद , 3/12/2017*
टिप्पण्या