दिवाळीचा फराळ कुरकुरीत कसा ठेवावा
फक्त दिवाळीत नाही इतर वेळीही या टिप्स मुळे तुमचे नरम झालेले नमकीन कुरकुरीत करू शकाल !☺️
दिवाळी चे पदार्थ कुरकुरीत कसे ठेवायचे/करायचे ?
दिवाळी आली ही हा प्रश्न सर्वाना पडतो
केलेले पदार्थ कुरकुरीत कसे राहतील
चकली बद्दल तर केल्या दिवसा पासून पडतो, कारण करतानाच मऊ होतात
या सगळ्या साठी ह्या महत्वाच्या टिप्स
1) तुमच्या कडे मायक्रोवेव्ह आहे? OTG आहे? एअर फ्रायर आहे ? ओव्हन आहे ?
निदान इस्त्री तरी आहे?
हॉट एअर गन आहे?
मोठे पातेले आणि गॅस/चूल आहे ?
परचमेन्ट पेपर आहे केक करताना लागतो तो ?
काय आहे ?
इच्छा आहे ?
2) दिवाळी चे किंवा नेहेमीचे इन कोर्स ऑफ टाईम नरम पडतातच त्यात नवीन काही नाही आणि कोणाचीच चूक नाही
3) फक्त जर हे पदार्थ कुरकुरीत करून दिलेत तर आवडते सगळ्यांना आणि कौतुक होते तुमचे ,भले ते पदार्थ विकतचे का असेनात? घरी केल्या प्रमाणे लागतात आणि तुमच्या सुगरण कौशल्याचे कौतुक होते
4) पण मिसळ, ओली भेळ मध्ये नरम झालेले पदार्थ खपून जातात कळत नाही नरम पडलेले
( थोडक्यात मिसळ/ भेळ करून खपवा- फक्त तेलाचा वास येता कामा नये हे पाळा- )
5) हे पदार्थ प्लास्टिक/पेट बोट्टल मधेच चांगले आणि कुरकुरीत ,नरम न होता राहतात हवाबंद झाकण असेल तर - नसले तर अल्युमिनियम किंवा प्लास्टिक ची फॉइल/फिल्म लावून ठेवा
स्टेनलेस/पितळी डब्यात ठेवलेत तरी फॉइल/फिल्म लावा झाकणा खाली - पत्र्याचा डबा नका वापरू घाण खवट वास येतो पूर्वी वापरत असत तेव्हा !☺️
6) हो आणखी हे पदार्थ सारखे सारखे कुरकुरीत करून चालत नाहीत कारण त्यातील तेल जाऊन चव उतरते - एकदाच करायचे जेव्हढे खायचे तेव्हढेच करायचे हे पक्के लक्षात ठेवा!
7) मायक्रोवेव्ह मध्ये एक प्लेट पदार्थ अर्धा ते एक मिनिट हाय वर करपू न देता आणि पदार्थ काय असेल त्या प्रमाणे ठरवा - चकली ,चिवडा,शेव,अर्धा ते एक मिनिट ,शंकरपाळे,आणि सुख्या करंज्या(ओल्या नारळाच्या नाहीत) अर्धा मिनिट, खवा घातलेले ,पदार्थ अर्धा मिनिट गरम करून पुरते
करपत नाही हे बघणे महत्वाचे
8) एअर फ्रायर वर पण हेच प्रमाण पण प्रत्यक्ष वापरताना लक्ष ठेवा ,प्रयोग करा पण थोडया प्रमाणात
9) ओव्हन तुमचा गॅस खालचा किवा ओटीजी असेल तर तो - प्रथम प्री हिट करा 175 डिग्री ला आणि मग एक एक पदार्थ 4,5 मिनिटे लक्ष ठेऊन गरम करा
10) इस्त्री असेल तर पातेल्यात पदार्थ ठेऊन त्या पातेल्या वर झाकण ठेवून त्या वर इस्त्री ठेवा गरम करत
11) एअर हिट गन असेल तर काहीच प्रश्न नाही पिझ्झा करण्या पासून ही वापरता येते आणि कुठलेही पदार्थ गरम करणे कुछ मिनिटोका काम / खेल आणि ते ही न करपता -- खरोखर हे एक वरदान आहे -500 ते 1000 रुपयाला मिळणारे -अनेक उपयोग आहेत किचन सोडून!☺️☺️
12) पारंपरिक गॅस/ चूल वापरून --
केक केला आहे मोठ्या पातेल्यात केक चे भांडे ठेऊन -- अगदी तसेच करायचे पण केक ऐवजी हे पदार्थ ठेऊन ते कुरकुरीत करायचे
कशी आहे आयडिया ची कल्पना ? ☺️☺️
13) परचमेन्ट / केक करायचा कागद हा 150 डिग्री तापमान सहन करतो त्या मध्ये सँडविच देखील ग्रील करता येते -- त्या कागदात किंवा कागदावर आपले दिवाळी पदार्थ ठेऊन तो कागद तव्या वर ठेऊन ते पदार्थ गरम केले की किरकुरित होतात - प्रवासी टिप्स आहे ही हा पेपर 10 ते 20 रुपये मीटर मिळतो 12 इंच रुंद - खूप उपयोगी वस्तू आहे हिट गन सारखी
14) आणखी तुम्हाला काही सुचते आहे का ?, का हे वाचून सुन्न झाले आहात ??☺️☺️☺️
ही पोस्ट/ आयडिया पुर्ण माझ्या आहेत पण कॉपी करून तुमच्या कडे परत परत येतील तेव्हा माझी आठवण ठेवा बस !,
बाकी ज्ञान वाटायचे च आहे तुमच्या उपयोगासाठी !
दिवाळी सुखाची/ सुरक्षित/आणि आपल्या आवडत्या कुरुंबियां बरोबर जाऊदे ही सदिच्छा !
गद्रे काका
#गद्रेकाका
टिप्पण्या