भारतातील मठांची माहिती

🌹 *शंकराचार्य* 🌹

प्राचीन भारतीय सनातन परंपरेचा विकास आणि हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार यांच्यात आदी शंकराचार्य यांचे महान योगदान आहे. त्यांनी भारतीय सनातन परंपरेचा संपूर्ण देशात प्रसार करण्यासाठी भारताच्या चारही कोपऱ्यात शंकराचार्य मठांची (पूर्वेला गोवर्धन, जगन्नाथपुरी, पश्चिमेला शारदामठ, गुजरात, उत्तरेला ज्योतिर्मठ, बद्रीधाम आणि दक्षिणेला शृंगेरी मठ, रामेश्वर) स्थापना केली होती. इ. स. पू. आठव्या शतकात स्थापन केलेले हे मठ आजही चार शंकराचार्यांच्या नेतृत्वाखाली सनातन परंपरेचा प्रचार आणि प्रसार करत आहेत.
आदी शंकराचार्यांनी या ४ मठांच्या व्यतिरिक्त पूर्ण देशात १२ ज्योतिर्लिंगांची स्थापना केली होती .आदी शंकराचार्यांना अद्वैत परंपरेचे प्रवर्तक मानले जाते.
मठ गुरु शिष्य परंपरेच्या निर्वहनाचे प्रमुख केंद्र आहेत. पूर्ण भारतात सर्व संन्यासी वेगवेगळ्या मठांशी जोडलेले असतात. या मठांमध्ये शिष्यांना संन्यासाची दीक्षा दिली जाते. सन्यास घेतल्यानंतर नावानंतर दीक्षित म्हणून विशेषण लावण्यात येते ज्यावरून असा संकेत मिळतो की हा संन्यासी कोणत्या मठाचा आहे आणि वेदाच्या कोणत्या परंपरेचा वाहक आहे. सर्व मठ वेगवेगळ्या वेदांचे प्रचारक असतात आणि त्यांचे एक विशेष महावाक्य असते. मठांना ‘पीठ’ असे देखील म्हटले जाते. आदी शंकराचार्यांनी या चारही मठांमध्ये आपल्या योग्यतम (सर्वांत योग्य) शिष्यांना मठाधिपती बनवले होते. ही परंपरा आजही या मठांमध्ये प्रचलित आहे. प्रत्येक मठाधिपतीना शंकराचार्य म्हटले जाते आणि ते आपल्या जीवन काळातच आपल्या सर्वांत योग्य शिष्याला उत्तराधिकारी बनवतात.

*आदी शंकराचार्यांनी स्थापन केलेले चार मठ*

*१. श्रृंगेरी मठ*

हा मठ भारतातील दक्षिण रामेश्वरम मध्ये आहे. त्याच्या अंतर्गत दीक्षा घेणाऱ्या संन्यासिंच्या नावामागे सरस्वती, भारती आणि पुरी संप्रदाय नाम विशेषण लावण्यात येते ज्यावरून त्यांना त्या संप्रदायाचे संन्यासी मानण्यात येते. या मठाचे महावाक्य ‘अहं ब्रह्मास्मि’ आहे आणि हा मठ ‘यजुर्वेद’ प्रचारक आहे. या मठाचे पाहिले मठाधिपती आचार्य सुरेश्वर होते. सध्या स्वामी भारती कृष्णतीर्थ या मठाचे ३६ वे मठाधिपती आहेत.

*२. गोवर्धन मठ*

गोवर्धन मठ भारतातील ओडीसा पुरीत आहे. या मठाच्या अंतर्गत दीक्षा घेणाऱ्या संन्यासिंच्या नावामागे ‘अरण्य’ संप्रदाय नाम विशेषण लावण्यात येते ज्यावरून त्यांना त्या संप्रदायाचे संन्यासी मानले जाते. या मठाचे महावाक्य आहे ‘ प्रज्ञानं ब्रह्म ‘ आणि हा मठ ऋग्वेदाचा प्रचारक आहे. या मठाचे पहिले मठाधिपती आदी शंकराचार्यांचे पहिले शिष्य पद्मपाद झाले. सध्या निश्चलानंद सरस्वती या मठाचे १४५ वे मठाधिपती आहेत.

*३. शारदा मठ*

शारदा ( कालिका ) मठ गुजरात मध्ये द्वारकाधाम इथे आहे. याच्या अंतर्गत दीक्षा घेणाऱ्या संन्यासिंच्या नावामागे ‘तीर्थ’ आणि ‘आश्रम’ संप्रदायाचे नाम विशेषण लावण्यात येते ज्यावरून त्यांना त्या संप्रदायाचे संन्यासी मानले जाते. या मठाचे महावाक्य आहे ‘तत्वमसी’ आणि हा मठ सामवेदाचा प्रचारक आहे. शारदा मठाचे पहिले मठाधिपती हस्तामलक (पृथ्वीधर) होते. ते आदी शंकराचार्यांच्या प्रमुख ४ शिष्यांपैकी एक होते. सध्या स्वामी स्वरूपानंद सरस्वती या मठाचे ७९ वे मठाधिपती आहेत.

*४. ज्योतिर्मठ*

ज्योतिर्मठ उत्तराखण्डमधील बद्रिकाश्रम इथे आहे. ज्योतिर्मठाच्या अंतर्गत दीक्षा घेणाऱ्या संन्यासिंच्या नावामागे ‘गिरी’, ‘पर्वत’ आणि ‘सागर’ संप्रदाय नाम विशेषण लावण्यात येते ज्यावरून त्यांना त्या संप्रदायाचे संन्यासी मानले जाते. या मठाचे महावाक्य ‘ अयमात्मा ब्रह्म ‘ आहे आणि हा मठ अथर्ववेदाचा प्रचारक आहे. या मठाचे पहिले मठाधिपती आचार्य तोटक बनले. सध्या कृष्णबोधाश्रम या मठाचे ४४ वे मठाधिपती आहेत.
या ४ मठांव्यतिरिक्त तामिळनाडू मधील कांची मठ देखील शंकराचार्यांनी स्थापन केला आहे असे मानले जाते .  याच मठाचे मठाधिपती स्वामी जयेंद्र सरस्वती परवा स्वर्गवासी झाले !

*संकलन :-- अशोककाका कुलकर्णी*

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट