घटस्फोट घेऊ नका
*घटस्फोट घेऊ नका*
*नवरा बिचारा काय म्हणतो*
*किमान ऐकून घ्या*
*पटलं तर हो म्हणा*
*नसता सोडून द्या*
*साध्या क्षुल्लक कारणा वरून*
*वाद घालू नका*
*घरातल्या मोठ्या माणसांना*
*चर चर बोलू नका*
*काय उपयोग आहे तुझ्या*
*उच्च शिक्षित असण्याचा*
*मुळीच गर्व करू नकोस*
*थोडं बरं दिसण्याचा*
*नौकरी करतेस , हातभार लावतेस*
*चांगली गोष्ट आहे*
*फड फड तुझं बोलणं*
*कुठं बेस्ट आहे ?*
*आईशी सलगी करतांना*
*सासुशी नको भांडू*
*आयुष्यातले सुखाचे क्षण*
*उगीच नको सांडू*
*स्वछता , टापटीप*
*घर पॉश असावं*
*याचा अर्थ असा नाही की*
*घरात कुणीच नसावं*
*थकलेले आई वडील*
*सांग कुठे जातील ?*
*आज ना उद्या आई बाबा*
*मुला कडेच येतील*
*खरं सांग या मुद्द्यावर*
*भांडण व्हायला पाहिजे का ?*
*म्हातारपणी त्यांनी काय*
*आश्रमात जायला पाहिजे का ?*
*अशिक्षित आहेत ,साधे आहेत*
*मान्य आहे मला*
*याचा अर्थ असा नाही की*
*घालून पाडून बोला*
*आई वडिलांचं दिसणं नाही*
*असणं महत्वाचं असतं*
*म्हातारी माणसं असतील तर*
*घर शोभून दिसतं*
*आई वडील घरात असणं हा*
*इंटेरियरचाच भाग आहे*
*समजू नकोस सुरकूतला चेहरा*
*पॉश हॉलला दाग आहे*
*खर्च होतो खर्च होतो*
*होऊ दे आशीर्वाद मिळेल*
*तू म्हातारी झाल्यावर तूला*
*सारं काही कळेल*
*शिकली सवरली मुलगी तू*
*यावरून घटस्फोट व्हावेत ?*
*लाखोंचं पॅकेज असलं तरी*
*मार्क शून्य द्यावेत*
*तुझ्या आई वडिलांचा*
*मी आदर करतो*
*पाहतीस तू चालतांना*
*त्यांचाही हात धरतो*
*थकलेल्या देहां सोबत*
*आपलं तुपलं करू नको*
*माणसांना दूर फेकून*
*वस्तूंनी घर भरू नको*
*म्हाताऱ्याना काही नको*
*फक्त गोड बोला*
*म्हण न तू सासूबाई*
*वालाच्या शेंगा सोला*
*मुलींनो समजून घ्या*
*नवरा काय म्हणतो*
*माया ,प्रेम ,आपुलकीनेच*
*फ्लॅट स्वर्ग बनतो !*
*अहंकार आणि राग राग करून*
*आपलं घरटं मोडू नका*
टिप्पण्या