दंगलीचे फायदे
*मोर्चात भाग घेताय ?* दगडफेक करताय ,,,हे वाचा ....पुढील परिणाम काय होतात ..........नाहीतर ??😢
किती उथळ विचारांचे युवक असतील हे? करियर ची माहिती नाही. चिंता नाही. *कोणी वाली नाही.* मार्गदर्शक नाही. नेते मंडळी फक्त आणि फक्त ह्यांचा वापर करतात आणि स्वतःच्या पोळ्या भाजून घेतात. *नेते किंवा नेत्याच्या घरचे कधीतरी रस्त्यावर हंगामा करतांना दिसतात का?* विचार करा रे...
हल्ली राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीय private नोकऱ्या देतांना संभाव्य उमेदवाराची संपूर्ण माहिती घेतात..
(पिझा हट, डोमिनोज, मकडोनाल्डस...)
*2, 4 मुलाखती* नंतर
ब्लड टेस्ट
Urin टेस्ट
ड्रग टेस्ट
*पोलीस रेकॉर्ड*
मागील 12 वर्षातले वास्तव्य
आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड ...
*हे सगळं clear असेल तरच job मिळतो.*
*हिरोगीरी महागात पडू शकते.*
हे तरुण स्वतःच्या हाताने भवितव्य खराब करून घेत आहेत. *एकदा अटक होऊन पोलीस रेकॉर्ड वर नाव गेलं की करियर संपलं.*
*आरक्षण मागत आहात पण ते कुठल्या क्षेत्रात मिळणार आहे?* सरकारी नोकऱ्या तशाही कमी होत आहेत. आरक्षणाचा फायदा फक्त 2, 5 जणांना होणार आहे. बाकीच्यांचे काय?
पण ह्यांना समजावणार कोण...?
©RT😎
*साधारण 20 वर्षापुर्वी कोल्हापुर मधे आंदोलन झाले होते.* दगडफेक, जाळपोळ,बसेस फोडल्या,दुकानाचे नुकसान.
नेते ac hotel मधे बसून दंगलीचे नियोजन करीत होते. दंगल झाल्यावर *पोलिसांनी 400 च्या वर तरुणांना अटक केली व गुन्हे दाखल केले.*
*ही मुले आता काय करतात.*
*यांच्या केसेस कोर्टात 10 ते 15 वर्ष चालल्या.* प्रत्येक तारखेला हजर रहाणे.वकील फी 500रु प्रत्येक तारखेला.साधारण 50 ते 75 हजार प्रत्येकाने वकिलावर खर्च केले.इतर खर्च वेगळा , *जसे जामीन साठी, पोलीस ठाण्यात, कोर्टात जाणे येणे,* तारखेदिवशी रजा म्हणजे 500 ते 1000 रोजगार बुडला. हा सर्व खर्च 3 ते 4 लाख प्रत्येकी.
*पोलिस स्टेशन ला काही दिवस रोज हजरी देणे याना बंधनकारक होते.* पो.स्टे ला गेला की शंभर दोनशेला चुना. नंतर 8 दिवसानी हजेरी देने. *जी मुले10वी 12 वी ला होती त्यांच्या परीक्षा बुडल्या.* ते पुढील शिक्षणाला मुकले. घरात या मुलाना अर्थाजन कर नाही तर बाहेर होणे अशी परिस्तिथि आली. ही मुले नंतर सिनेमची टिकिट काळाबाजार, हमाली, काळे धंदे,बार हॉटेल वेटर व इतर हलकी कामे करू लागली.
*जी कॉलेज ला होती त्याना कॉलेज ने नारळ दिला.* ही मुले ही उच्च शिक्षणाला मुकली. पोलिस रेकॉर्ड गुन्हा असल्याने *कोणत्याही बँकेने ,finance कंपनीने व इतर अस्थापनानी याना नोकऱ्या दिल्या नाहीत.* बसले मग वड़ा पाव, अंडा भुर्जी विकत ,चोऱ्या माऱ्या करत. *कुठे ही खुट झाले की पोलिस आधी प्रतिबंधक कार्यवाही म्हणून याना उचलतात.* आधी पोलिस हात साफ करुन घेतात.दोन तिन दिवस आत ठेवतात.नंतर यांचे आई बाप ,भाऊ बायको येवून पोलिसांचे हात ओले करुन याना सोडवतात. यांची लग्ने होताना याना चांगल्या घरच्या पोरी मिळाल्या नाहीत, काहींची लग्ने झाली नाहीत. *याना कधीही पासपोर्ट मिळत नाही.* यांच्या वर्गातील मित्र याना टाळतात. *गल्लीत समाजात गुन्हेगार म्हणून शिक्का.*
पोलिसांची आंदोलक पकड़ण्याची एक पद्धत असते. ते एका दुसऱ्याला प्रथम पकड़तात. त्याला टायर मधे घातला की तो 10 ते 20 जणांची नावे पटापट सांगतो. त्या दहा विस् जणांना परत टायर.असे करत सगळे सापडतात.मग गुन्हे दाखल करतात.
*आता ज्या नेत्यांनी ही दंगल घडविली ते कधीही या मुलांची चौकशी करायला पो.स्टे.कोर्टात आले नाहीत की त्यांच्या पक्षाने या मुलांसाठी काही केले नाही.*
ते नेते मंत्री संत्री झाले.त्यानी अमाप कमविले. नंतर त्यांची *मुले मंत्री झाली.* त्यानी अमाप संपत्ती मिळविली. त्यांची नातवंडे बाहेर शिकुन आली.आता ते दंगल भड़कविन्यास सज्ज झालीत. नेत्यांच्या आया, बहिनी ,बाप भाऊ मुले सूना जावई व नातेवाईक हे साखर कारखाना,दूध संघ, सोसायटी, को ऑप बैंक , अर्बन बँक,सूत गिरणी व इतर ठिकाणी चेरमन संचालक वगैरे आहेत. छान आयुष उपभोगलेे,उपभोगत आहेत.परदेशी जाऊन मौज करतात .महागड़े उपचार घेतात.
*मित्रानो हे लक्षात घ्या. एका तरी पुढाऱ्याला याची झळ बसली आहे का हो?*
तरुणांनी विचार करावा ......आपण नेमकं काय करावे............ते ??????? *🙏🏼आपला एक मित्र🙏🏼*
टिप्पण्या