खरा आदिवासी : आदिवासींबद्दलचे हे गैरसमज दूर करा
केंद्र शासनाने युनोला (UNO) सादर केलेल्या अहवालानुसार - भारतामध्ये सर्व लोक कोणत्या ना कोणत्या धर्मात आहेत. आदिवासी हे हिंदू धर्मातील सण/उत्सव साजरे करतात. हिंदू धर्मानुसार रूढी, परंपरा यांचे पालन करतात म्हणून भारतातील आदिवासी हे हिंदूच आहेत. म्हणून भारतात आदिवासी नाहीत असे केंद्र शासनाने संयुक्त राष्ट्रसंघास (UNO - United Nation Organisation) कळविले आहे.
याचा परिणाम असा होईल की, या देशात / राज्यात आदिवासी नाहीतच तर बाहेरून अरब खिंडीतून भारतात आलेले आर्य ब्राम्हण हेच या देशाचे मूळ मालक आहेत. हे ते जगास सहजच पटवून देवू शकतील.
आणि हे सगळे घडेल केवळ आदिवासींच्या भोळेपणामुळे, अज्ञानामुळे. आदिवासीच आदिवासींच्या अधोगतीला, पर्यायाने न्याय हक्कांपासून वंचित राहायला कारणीभूत ठरेल.
म्हणून *आदिवासी बांधवा वेळीच जागा हो, महान आदिवासी संस्कृतीचा धागा हो.*
गणपती, दहिहंडी, सत्यनारायण, दसरा इ. हे हिंदू धर्मशास्त्रातील सण/विधी/उत्सव आहेत.
✒ *आदिवासी* हाच आदिवासींचा धर्म.
✒ आदिवासींना कोणताच धर्म नाही. म्हणूनच आदिवासींच्या जातीच्या दाखल्यावर, Validity प्रमाणपत्रावर धर्माची नोंद केली जात नाही. (हवे तर दाखले काढून पहा.)
✒ आदिवासी *निसर्गपूजक,* आहे.
✒ आदिवासी नैसर्गिक शक्तीला पूजतात. पशू, पक्षी, वृक्ष यांची पूजा करतात.
✒ *वर्सुबाई* आदिवासींची देवता असल्याने आदिवासी लोक वरसाचे झाड तोडत नाहीत. जळणासाठी वरसाच्या लाकडाचा वापर करीत नाहीत. वर्सुबाईचा उत्सव साजरा करतात.
✒ *कळमजाई* आदिवासींची देवता आहे. आदिवासी लोक कळंबाचे झाड तोडत नाहीत. जळणासाठी कळंबाच्या लाकडाचा वापर करीत नाहीत. कळंबाच्या झाडाची पूजा करतात. कळमजाईचा उत्सव साजरा करतात.
✒ आदिवासी जंगलचा राजा वाघाला पूजतात. *वाघोबा* देवाची पूजा करतात. पारंपरिक वेशभूषेत आनंदाने गातात, नाचतात. *वाघ बारस* मोठ्या आनंदाने साजरी करतात.
✒ *होळी, शिमगा* हा उत्सव सर्व आदिवासी जमातींत उत्साहाने साजरा केला जातो. आदिवासी गाणी, सोंगं, नाच करून आनंद साजरा केला जातो.
✒ प्रत्येक आदिवासी जमातीची (ठाकर, कातकरी, वारली, भिल्ल, कोरकू, कोलाम इ. या प्रमाणे एकूण सर्व ४७ जमातींची) संस्कृती, रीती-रिवाज, जीवन पद्धती, भिन्न आहे.
आदिवासींचे अनेक सण / उत्सव काळाच्या ओघात नष्ट होवू लागले आहेत. हिंदूंच्या संस्कृतीचे अनुकरण करून त्यांचेच सण उत्सव साजरे करू लागले आहेत. त्यामुळे आदिवासींची आदिवासी ही ओळख पुसली जात आहे.
--- म्हणूनच आदिवासी ही ओळख टिकवायची असेल, आदिवासी असल्याचा अभिमान असेल तर गणपती, दहीहंडी, दसरा, सत्यनारायण, इ. उत्सव, प्रथा साजऱ्या करणे टाळणे गरजेचे आहे.
📎 चावडी / समाजमंदिर, शाळेत, घरात, गणपती बसवत असाल तर आदिवासी विरोधी असलेली ही प्रथा ताबडतोब बंद व्हावी.
📎 ज्या मनुवादी धर्माने आदिवासींचे अस्तित्वच नाकारले, स्वत:चे श्रेष्ठत्व कायम राहावे यासाठी अमानवी अशा प्रथा सुरू केल्या, आदिवासींना शूद्रापेक्षाही शूद्र मानले, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारला अशा धर्माचे सुशिक्षित असूनही आचरण करणे हा अंधभक्तीचा प्रकार आहे.
📎 विज्ञान युगात राहातो आहोत. म्हणून एक प्रश्न स्वतःला जरूर विचारून पहा की, मळापासून जीवंत बाळ तयार होवू शकते काय ? माणसाला हत्तीचे मुंडके बसू शकते काय ? बसले असेल तर त्यावेळेस वैद्यकशास्त्र तेवढे प्रगत झाले होते काय ?
📎 ब्राम्हणांनी सण, उत्सवांच्या माध्यमातून इथल्या बहुजनांच्या मनात हिंदू धर्माचे विचार इतके खोलवर रुजवले आहेत की ते लोकांकडून सहजासहजी सुटणे अवघड आहेत.
📎 आता एकवेळ ब्राम्हण हिंदू रितीरिवाज पाळणार नाहीत पण इतर मंडळी न चुकता पाळतील.
📎 त्यावर आणखी कडी म्हणजे ब्राम्हणाप्रमाणे सर्व प्रकारचे पूजा विधी करण्यात इतर लोक कुशल झाले आहेत.
ब्राम्हणांना माहितीय की ब्राम्हणांची पोरं भविष्यात पूजा, विधी सांगत बसणार नाहीत. त्यामुळे धर्म परंपरा चालू ठेवायच्या असतील तर इतर लोकांनी पूजाविधी सांगितले पाहिजेत. ब्राम्हणांचा हा धूर्तपणा भोळ्या भाबड्या जनतेला सहज समजून येणे कसे शक्य आहे.
ब्राम्हणांनी त्यांचे धार्मिक हेतू लिलया, कुशलतेने साध्य केले आहेत. म्हणून तर ३% असणारे ९७% लोकांवर राज्य करत आहेत.
📎 ब्राम्हणांची पोरं विदेशात उच्च शिक्षण घेवून मोठ-मोठ्या नोकऱ्या व्यवसाय करतात. (काही तर ड्रिंक्स, मांस, मच्छी खातात. त्यांनी सुरू केलेय आणि आपण सोडत चाललोय 😊 _अर्थात ड्रिंक्स हेच आदिवासींच्या दयनीय अवस्थेस कारणीभूत आहे.)_
📎 धार्मिक विधींसाठी खर्च करण्यापेक्षा तोच पैसा स्वतःच्या मुला - बाळांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी खर्च करा. कारण निरर्थक धार्मिक विधी केल्याने मुलांची, कुटुंबाची प्रगती होण्याची शक्यता तर नाहीच उलट पैसा व्यर्थ खर्च होईल. परंतु जर का मुलांच्या चांगल्या शिक्षण सुविधा (पुस्तके, संगणक शिक्षण, विविध व्यावसायिक कोर्सेस, स्पर्धा परीक्षा क्लास, उच्च शिक्षण, इ.) उपलब्ध करून देण्यासाठी पैसा खर्च केला तर निश्चितच प्रगती होईल. कुटुंबाच्या प्रगतीसाठी खर्च करा. तसेच समाजातील गरजूंसाठी त्याचा आवश्य उपयोग करा.
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद,नाशिक विभाग
टिप्पण्या