फ्री कोर्स आपल्या बांधवांसाठी
अशा प्रकारची प्रशिक्षणे नेहमीच कुठे ना कुठे चालू असतात। आपल्या समाजातील बांधवाना मी विनंती करतो की त्यांनी सरकारी नोकरी साठी प्रयत्न करावेत मात्र सगळेच ह्यामध्ये सिद्द होत नसल्याने, तसेच असल्या प्रकारचे miscellaneous knowledge नेहमी गाठीशी बांधून ठेवावे।
वय वर्ष 33 नंतर आपल्याला स्वतः च्या पायावर , आणि कमी भांडवली व्यवसाय करण्यासाठी ह्याची मदत होते !! ते कसे बघा
1। हा पूर्ण फ्री कोर्स आहे
2। ह्यात प्रोफेशनल मार्गदर्शन, शिक्षक आपल्याला पूर्ण बेसिक आणि इंटरनॅशनल माहिती देतात। त्यामुळे आपल्याला भविष्यात होणाऱ्या नव्या अपडेट लवकर समजतात
3। राहायची सोय सरकारी शाळेत केली जाते
4। ह्यात आपल्याला आपल्या खात्यावर कोर्स केल्याबद्दल पैसे मिळतात
5। पास नापास असे इथं काही नाही, फक्त जायचं, शिकायचं आणि आपला व्यवसाय थाटायचा
6। ह्याच आपल्याला सर्टिफिकेट मिळतं
7। ह्या सर्टिफिकेट वर आपल्याला कोणत्याही नाशनाईज्ड बँकेतून कर्ज मिळते
8। ह्या कर्जावर जवळ जवळ 35 टक्के सबसिडी मिळते
9। KVIC नावाची संस्था वर्षभर हे कोर्सेस घेते, आपल्या जवळच्या KVIC सेंटर ला त्यासाठी संपर्क साधा
10। भारतात अशी भरपूर PMKVY (प्रधान मंत्री कौशल्य विकास योजना ) सेंटर आहेत, तिथेही सवलतीच्या दरात(₹ 50/- महिना) आपल्याला ही कोर्सेस करता येतात।
11। आपल्या मुलींला तर अजून सवलती ह्यात मिळतात
आपल्याला उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा
टिप्पण्या