गरज disconnect होण्याची
गरज अलिप्त होण्याची
(Need to Disconnect)
गेल्या काही महिन्यांत अशा काही गोष्टी वाचायला, पहायला मिळाल्या की खरोखरच त्याच्या वर अतिशय गंभीरपणे विचार करण्याची आवश्यकता आहे.
प्रयागराज येथे कुंभमेळ्यात 10000 तरुणांनी नागा साधू होण्याची दीक्षा घेतली...हे सगळे तरूण उच्च शिक्षित इंजिनिअर, एम बी ए वगैरे असून त्यातील कित्येकजण गल्लेलठ्ठ पगारावर काम करत होते.
ते म्हणाले आम्हाला ऐहिक गोष्टीशी Disconnect व्हायचे आहे...
खा *सौ सुप्रिया सुळे* यांनी ही संसदेत" राईट टू डीसकनेक्ट' हा कायदा मंजूर करून घेतला , त्यास अनुसरून,
खरोखर आजच्या काळात शांतीपूर्ण आयुष्य जगण्यासाठी काहीं गोष्टींपासून disconnect होणे अनिवार्य झाले आहे ..
आपण साधू होऊ शकत नाही पण काहीं गोष्टींपासून disconnect होऊन आपले आयुष्य सुसह्य तर बनवू शकतो ना ?
त्यासाठी प्रथम आपण कोणत्या गोष्टींच्या आहारी गेलो आहोत हे प्रत्येकाने जाणून घेऊन त्यापासून स्वतःला disconnect करून घेणे आवश्यक आहे
उदाहरणार्थ
वानप्रस्थाची वेळ आली तरी प्रपंचातील मोह न सोडणे
आपली पुढची पिढी सक्षम नाही हे गृहीत धरून माणसं वागत असतात.
तिथे disconnect होणे जरुरीचे आहे.
आपली आई किंवा सौ. अगदी अमेरिकेत असल्या तरीही तिथून फोन करून सांगतात की गिझरचे बटन , गॅस , लाँड्री इ. इ ... किती हा possessiveness !!
प्रत्येकाला आपली जबाबदारी समजते -
तुम्ही थोडेसे डिस्कनेक्ट व्हा न.
Relax !! ...
पण नाही माझ्या माघारी घर चालेल की नाही हा अनाठायी घोर त्यांना सतावत असतो...
तिथे disconnect होणे गरजेचे आहे.
एक खूप brilliant मुलगा..
आय आय टी मद्रास कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीतून MBA केले.
अमेरिकेत एखाद्या यशस्वी माणसाकडे जे जे काही असते ते सर्व त्याच्या कडे होते.
अमेरिकेत जेव्हा मंदी आली तेव्हा होत्याच नव्हतं झालं
शेवटी त्याच्या बायकोने आणि त्याने आत्मघाती निर्णय घेत पहिल्यांदा मुलांना मारले नंतर बायकोने शेवटी स्वतः वर गोळी झाडून जीवनाचा अंत केला.
थोडक्यात ...ही अपयशाची भिती म्हणायची की अमेरिकेतच रहायचा अट्टाहास, का लोक काय म्हणतील ही भिती? ....
माणसाला स्वतःच्या मुलांच्या जीवापेक्षा यश इतके महत्वाचे वाटते ?
आजकालचे तरुण IT मध्ये नोकरीला लागलेली मंडळी किंवा private इंडस्ट्रीत काम करणारी मंडळी अगदी २५ /३० वर्षाच्या वयात उच्च रक्तदाब ,
मधुमेह , मानसिक व्याधींनी ग्रासलेले आहेत.
त्यांनीही स्वतःच्या जीवाचे मोल ओळखून काही गोष्टींपासून स्वतःला disconnect करून घ्यायला हवे.
महत्वाकांक्षा असावी पण तिची सीमारेषा ही ठरवावी .
महत्वाकांक्षेला "आपल्या वर " आरूढ होऊ देऊ नये.
आजकालच्या काळात पालकांचा मुलांच्या जीवनात व करीअर मध्ये एवढा हस्तक्षेप झाला आहे की करीअर मुलाचे आहे का पालकांचे हे समजणे कठीण झाले आहे.
मुलांची इच्छा नसताना पालक त्यांच्या आयुष्यात गुंतले आहेत...
इथे खरोखर Disconnect होणे गरजेचे आहे.
भिती, राग, लोभ, लालच, प्रेम , मत्सर ह्या सगळ्याच गोष्टींचा अतिरेक हल्ली पाहायला मिळतो आहे.
प्रत्येकालाच त्या "अति" पासून Disconnect होणे आवश्यक आहे.
Disconnect होणे ही गोष्ट सहज सोपी नाही ह्याची मला कल्पना आहे.
पण मनाचा निग्रह केला तर बर्याच अंशी disconnect होणे जमू शकते.
तुम्ही ही एक पद्धत (methodology) वापरली तर हे जमू शकेल.
प्रत्येकाने निदान हा प्रयत्न करणे तरी गरजेचे आहे.
(अ) Find (शोधा ) -
ज्यामुळे तुम्ही दुःखी आहात, त्रासलेले आहात, घाबरलेले आहात.
(ब) Fix it (निश्चित करा) -
कोणत्या गोष्टींमुळे तुम्हाला जास्त त्रास होतो आहे ते पहा.
(क) Forget (विसरा ) -
देवानंद ह्यांच्या ' हम दोनो ' सिनेमात " मैं जिंदगी का साथ निभाता चला गया - हर फिक्र को धुंवे मे उडाता चला गया" हे गाणं ऐकलं की Forget शब्दाचा अर्थ कळेल.
(ड) Forgive (माफी ) -
🙏🌹माफ करायला शिका तसेच confess (कबूल) करायला शिका. 🌹🙏
(ई) Follow ( शिष्यत्व ) -
वरच्या सगळ्या गोष्टी सांगणे सोपे आहे - अमलात आणणे अतिशय अवघड असते ...आणि त्या साठी संत साहित्य, विद्वान लोकांचे चरित्र व विचार follow केले तर Disconnect व्हायला खूप मदत होऊ शकेल.
आपलं आयुष्य खूप मोलाचं आहे
स्वतःसाठी तितकंच तुमच्या आप्तांसाठी
तेंव्हा कोणत्याही गोष्टींचा अतिरेक टाळलेलाच बरा नाही का ......🙏🙏🙏
टिप्पण्या