कोरोना आणि भारताची मेडिकल स्थिती
*भयावह..!*
हा निष्काळजी पणा असाच चालू राहिला तर भयंकर परिस्थिती येईल. 140 कोटी लोकसंखेच्या देशात शंभरच्या आत टेस्टींग लॅब आहेत. बोटावर मोजण्या ईतक्या दवाखान्यांत उपचार उपलब्द आहेत. सध्या लागण झालेले लोक मोजकेच आहेत म्हणून त्यांना योग्य प्रकारे खबरदारी घेत उपचार सुरू आहेत.
हा आकडा वाढत गेला तर प्रशासन तरी काय करणार.? आहे तेथे उपचार घेण्यास सांगीतल जाईल, मेडीकलमधून गोळ्या-औषधे तुटवडा होईल व मिळणार नाहीत (शिल्लक रहाणार नाहीत), स्थानिक डॉक्टर भितीपोटी उपचार करणार नाहीत, घरात मृत्यू झाले तरी कुणी बघायला येणार नाही, मृतदेह वाहून न्यायला वाहनं मिळणार नाहीत, अंत्यविधी करणे अवघड होऊन जाईल, मोठमोठे खड्डे घेऊन JCB ने मृतदेह एकत्र पुरले जातील, त्याहिपेक्षा परिस्थिती हाताबाहेर गेली तर घरा घरात मृतदेह कुजून सापळे बनतील......
15-20 दिवसांपूर्वी परदेशातून आलेल्यांना परदेशात कोरोना लागण झाल्यानंतर आता लक्षणे जाणवून ते ॲडमीट होत आहेत. गेल्या 15-20 दिवसांत ते किती लोकांच्या संपर्कात आलेले असतील, ते ज्यांच्या संपर्कात आलेत ते किती जणांच्या संपर्कात आले असतील... विचार करणे अवघड होत आहे.
प्रशासन पोटतिडकीने बाहेर पडू नका म्हणून सांगत आहे तरी लोकांना काडीमात्र फरक पडत नाहीये. आजीबात लोकं गंभीर होत नाहीयेत. ट्रेन्स फुल्ल भरून वाहत आहेत, लग्न समारंभ धडाक्यात सुरू आहेत, 10% देखील लोक मास्क लावताना दिसत नाहीयेत. जीवनावश्यक नसलेल्या वस्तू बाजारात खुलेआम विकल्या जात आहेत, घेणारेही गर्दी करत आहेत.
हे घाबरून देण्यासाठी आजीबात लिहीत नाहीये तर आपण वेळीच जागं होऊन प्रशासनाला सहकार्य करत काळजी घ्यावी म्हणून लिहीत आहे. प्रत्येकाने काळजी घेणे अत्यावश्यक आहे. ईटलीसारखा तुरळक लोकसंख्या आणि प्रगत असलेला देश आज हतबल झालेला दिसत आहे तर आपण कशात काय?
जबाबदारी प्रशासनाची जीतकी आहे त्यापेक्षा जास्त आपली आहे. गरज नसताना किंवा गरज असताना देखील घराबाहेर पडणे म्हणजे मृत्यूलोकात पाऊल टाकल्यासारखे आहे.
परत एकदा नमूद करतो, सदर पोस्ट ही भिती घालण्यासाठी नसून वेळीच डोळे उघडण्यासाठी आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. प्रशासन खुप काळजी घेत आहे, आपणही आपली जबाबदारी योग्य रित्या पार पाडावी. शक्य तेवढ आयसोलेट होऊन रहा. नाहीतर पहिल्या परिच्छेदातील परिस्थिती यायला वेळ लागणार नाही.
'जो काळजी घेईल तो जगेल'
डॉक्टर, पोलीस आणि प्रशासन तुमच्यासाठी घर सोडून बाहेर आहे तुम्ही तुमच्याचसाठी घरात रहा.
पुढील काही दिवस भयावह असतील. काळजी घ्या..!
#Death_calling
#corona
#responsibility
#stay_isolate
टिप्पण्या