कोडे

सर्वांना आता कोरोनामुळे भरपूर वेळ असल्यामुळे एक कोडे पाठवत आहे...थोडा विचार केला तर शब्द मिळेल....

शेवटचे अक्षर "की"असलेले  शब्द शोधायचे आहेत.

०१ दाराची बहीण -- खिडकी
०२ मातीची भांडी -- मडकी 
०३ कृष्णाची माता -- देवकी 
०४ नवनागातील एक नाग -- 
०५ एक कडधान्य -- 
०६ छोटे लाकूड -- 
०७ एक अलंकार -- 
 ०८ एक काव्यप्रकार -
 ०९ एक आजार -- 
 १० एक नाते -- 
 ११ दोन बोटांनी केलेला आवाज --
 १२ छोटी पोळी -- 
 १३ रामपत्नी -- 
 १४ छोटे तालवाद्य -- 
 १५ नाकाचा अलंकार 
 १६ केवडा
 १७ आखूड -- 
 १८ पाहिजे तेव्हढी
 १९ चकचकीत -- 
 २० एक रंग -- 
 २१ शारीरिक आवेग -- 
 २२ केरळमधील धरण
 २३ ३॥ पट -- 
 २४ संगीत वैशिष्ट्य -- 
 २५ दुफळी
 २६ रंग उडालेली
 २७ एका घाटाचे नांव -- 
 २८ ढोंगी -- 
 २९ नाचणारी
 ३० पतंगाची मदतनीस -- 
 ३१ गुद्दा
 ३२ स्वतःभोवती फिरणे --
 ३३ एक नदी -- 
 ३४ अशुभ चेहरा -- 
 ३५ मोडलेली-- 
 ३६ आवडती -- 
 ३७ लबाड -- 
 ३८ निराधार -- 
 ३९ भीती
 ४० दुरावा असलेली
 ४१ एक जुने नाणे
 ४२ क्षणिक झोप
 ४३ कापसाचे बी -- 
 ४४ बडबडी -- 
 ४५ एक ऋषी -- 
 ४६ भावंडातील दुजाभाव --
 ४७ एक विद्यापीठ -- 
 ४८ कीड पडलेली -- 
 ४९ एक छोटे तालवाद्य -- 
 ५० पराक्रम --

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट