काय असते क्वारणटाईन
काल परवा पर्यंत पाश्चात्यांचे अंधानुकरण करणे आणि स्वतःच्या भारतीय जीवन पद्धतीस मागास समजण्यात धन्यता मानत होतो. पण कोरोनाच्या महामारीने जगाला झुकवलं, घरात कोंडून घ्यायला भाग पाडलं तेंव्हा आपल्या भारतीय जीवन पद्धतीवर नव्याने विचार करावासा वाटला. खालील काही प्रशांची उत्तरे आपसूक मिळाली.
१. पूर्वी संडास, आणि हातपाय धुवायला सोय घराबाहेर का असायची? क्वचित अंघोळीसाठीही.
२. अंत्यसंस्कार किंवा केशकर्तनावरून आल्यावर अंघोळीशीवाय कोणाला शिवायचीही परवानगी का नसायची?
३. चप्पल घराबाहेर सोडूनच घरात प्रवेश का?
४. घरात मृत्यू झाल्यावर १२ दिवस घरातून बाहेर पडण्याची परवानगी का नसायची? (यालाच होम क्वारंटाईन म्हणावे का?) काही ठिकाणी नवीन जन्म झाल्यावर काही दिवस बाळ आणि बाळाच्या आईला घरातल्याच एका खोलीत क्वारंटाईन करायचे. त्या खोलीच्या दाराला कडुनिंबाच्या पाल्यांचे तोरण बांधायचे.
५. मयत झालेल्या घरात १२ दिवस अन्न शिजवायचे नाही अशी पद्धत का असावी? १२व्या नंतर घरात साफसफाई का करतात?
६. शौच करण्याची भारतीय पद्धत का प्रचलित आहे? (आतड्यांना लॉक करणारे मसल्स अनलॉक झाल्याने मलाचा पूर्ण निचरा होतो, टॉयलेट पेपरची गरज नाही त्यामुळे इको-फ्रेंडली आहे, पाश्चात्य कामोडच्या सीटवरच्या लाखो विषाणूंचा डायरेक्ट शरीराला संपर्क होतो तसा भारतीय पद्धतीत होत नाही)
७. हळद आणि मसाले युक्त अन्न शरीराच्या प्रतिकार शक्तीला आपसूकच बळ देतात. लग्नाआधी हळदी समारंभ का असतो?
आता गोरे लोकही हळददूध प्यायला लागलेत, फरक एवढाच की ते त्याला 'टर्मरिक लाटे' म्हणतात.
८. घरात उद, कापूर जाळणे धूप फिरवणे यामागे काय कारण असावे?
९. ऋतुमानानुसार सणवार आणि अन्न नियोजन यामागे किती मोठा विचार असेल? उन्हाळा सुरू व्हायच्या आधीचा काळ हा वायरल इन्फेक्शनचा असतो. या काळातच दारोदारी होळी का पेटवली जाते? आपण शास्त्रोक्त पद्धतीने ठराविक आयुर्वेदिक झाडपाल्यांचा वापर करून पेटवतो की नाही?
१०. आपल्याकडे जनरली मृतदेह दफन करण्याऐवजी दहन करायची पद्धत का रूढ आहे? गुगल करा "cremate or bury". अनेक संशोधने मिळतील. तिकडे चीनने मृतदेहांना पुरण्या ऐवजी जाळण्याचे आदेश दिलेत.
११. जगातला सगळ्यात जास्त शाकाहारी असलेला देश भारतच आहे. असे का? इथे भारतात आपण प्राण्यांत पण देव पाहतो. झाडांमध्ये, दगडांमध्ये, नद्यांमध्ये, पर्वतांमध्ये ही! आम्हाला जगाने इको-फ्रेंडली व्हा हे शिकवणे म्हणजे मोठा विनोद आहे. आमच्या गोमातेची, गो भक्तीची चेष्टा होते. आम्ही कुत्र्यात पण देव पाहतो, खंडोबा म्हणतो. तिकडे चीनच्या युलीन फेस्टिवल मध्ये कुत्र्यांना भाजून खातात.
१२. एकाही व्हायरसचा जन्म भारतातून झाला आहे असे ऐकिवात का नाही? कारण आम्ही इकडे वटवाघूळ, उंदीर, मांजर कुत्री, ऑक्टोपस, साप, रातकिडे, अळ्या असे बेछूट खात नाही. सामिष खाण्यातही नियम आहेत ते पाळतो.
१३. उठसुठ हात मिळवणे, मुके घेऊन अभिवादन करणे असे प्रकार आपल्याकडे नसून हात जोडून नमस्कार करायची पद्धत का आहे?
आपली संस्कृती हजारो वर्षांपासून अस्तित्व टिकवून आहे. अनेक महामाऱ्या आणि संकटे झेलून अनुभव संपन्न झाली आहे. आमचीच संस्कृति किती वैज्ञानिक आहे याचा ढोल बडवायचा यात उद्देश अजिबात नाही. हे केवळ अनुभवातून शिकणे आणि कॉमन सेन्सचा भाग आहे. स्वतःच्या संस्कृतीला कमी समजणे आणि वेस्टर्न तेच योग्य ही विचारसरणी कोरोना पेक्षा घातक आहे.
यावर विचार व्हावा 🙏
टिप्पण्या