गावाला जाणाऱ्यांसाठी मेसेज
*#निमित्त कोरोनाचे,*
*गावाकडे घरात पंखा नाही, चुलीवर स्वयंपाक करताना डोळ्यात धूर जातो, सासरे तंबाखू खावून कुठेही थुंकतात, गावाकडची मुले फार वाईट शिव्या देतात – आपली मुले पण त्या शिकतील, पिण्याचे पाणी फार अस्वच्छ असते, दिराला अक्कल नाही, सासू शेतात जा म्हणते, कायम साडीच नेसावी लागते – गाऊन घालू देत नाहीत, संध्याकाळी बाहेर कुठे जाता येत नाही, आवडत्या मालिका चालू असताना स्वयंपाक करावा लागतो. सासरे केव्हाही चहा करायला सांगतात. धार काढता येत नाही म्हणून सासू टोमणे मारते, थोरली जाऊ सगळे साहित्य लपवून ठेवते,सगळा बाजार आपल्यालाच करावा लागतो. तुम्ही भोळे आहात – घरचे तुम्हाला फसवतात , पायाला माती लागून माझ्या टाचा फुटतात , उन्हाने चेहरा काळा पडतो, सगळ्यांना फक्त तुमचा पैसा पाहिजे , आमची कुणाला किंमतच नाही.*
*अशी नानाविध कारणे सांगून गावाकडे जाण्याचे कसोशीने टाळणा-या स्वतःला फार सुशिक्षित आणि शहाण्या समजणाऱ्या ( खेड्यातूनच गेलेल्या ) समस्त शहरवासिनी –*
*आणि*
*सगळे अनवाणी बालपण , ठिगळ लावलेल्या चड्ड्या , फडक्यात बांधलेली चटणी- भाकरी, वायरच्या पिशवीतले दप्तर , सकाळ – संध्याकाळ काम केलेली शेते, बापाचे कष्ट , शेतात राबणारे भाऊ , दहावीनंतर गावातच राहिलेले मित्र, गावाचा देव, हल्ली कायम कोरडा पडणारा ओढा , कायम पडणारा दुष्काळ , रेशनच्या दुकानासमोरील रांगा, सूर – पारंब्या , विटीदांडू , गोट्या या सा-याचा विसर पडलेल्या –*
*आणि*
*गगनभेदी सोसायटी मधील बाराव्या मजल्यावरील 2BHK कोंडवाडा, स्वतःसाठी चारचाकी , बायकोला भाजी आणण्यासाठी स्कुटी, मुलांसाठी सायकली, हजारो गोष्टीनी भरलेले घर , पुण्या – मुंबईच्या मधले विकेंड , भाकरीचा तिटकारा , मुलांना पोपट करणारे इंग्रजी शिक्षण, मती गुंग करणाऱ्या फि, फार उंचावर राहत असल्याने उंचावलेले राहणीमान , क्रेडीट कार्ड , कर्जाचा भयकारी हप्ता इत्यादी मध्ये गुरफटलेल्या –*
प्रिय खंडू आणि शहरवासी सुनबाई !
तुम्ही स्वतःला परके समजत असला आणि आता *कोरोना* च्या धास्तीने *मुलांसह* गावी येताना खजील झाला असला तरी – *आम्ही तुम्हाला परके समजत नाही . आमची दानत अद्याप कुणी हिराऊ शकले नाही. तुमचे तुमच्याच गावात स्वागत आहे !*
*#Corona outbreak*
टिप्पण्या