कोरोना आणि औद्योगिक मंदी

*एका गावात एक श्रीमंत सावकार होता. एक दिवस गावातील एक वृद्ध गृहस्थ त्याच्याकडे आले आणि म्हणाले, आमच्या घरी आज काही पाहुणे येणार आहेत.*

 *तुमच्याकडची दोन चांगली भांडी मिळतील का ?  सावकाराने त्यांना भांडी दिली. भांडी परत आली तेव्हा ती दोन ऐवजी चार होती.*

*सावकाराने आजोबांना विचारलं तेव्हा आजोबा म्हणाले, एक भांडं 'व्यालं' आणि त्याने दोन भांड्यांना जन्म दिला. पुढल्या वेळी आजोबांनी पुन्हा भांडी  मागितली.*

*मागितली होती दोन. हुशार सावकाराने दिली चार ! परत येताना चाराची सहा भांडी आली. आजोबांचे पुन्हा तेच उत्तर ! सावकाराने विचार केला, हा चांगला धंदा आहे !* 

पुढल्या वेळी आजोबांनी भांडी मागितली तेव्हा, न विचारता सावकाराने दुप्पट भांडी दिली आणि तीही चांदीची ! 

*सावकाराने विचार केला, यावेळी चारपट भांडी परत येतील आणि तीही सोन्याची येतील !*

*यावेळी मात्र आजोबा रिकाम्या हाताने रडत रडत आले. सावकाराने विचारलं, माझी भांडी कुठायत ?*

*आजोबा रडत रडत म्हणाले, तुमची सगळी भांडी मेली !!*

सावकार आजोबांना घेऊन राजाकडे गेला.
राजाने सगळी कहाणी ऐकून घेतली. राजा सावकाराला म्हणाला, भांडी जन्म देऊ शकतात,  तशी मरूही शकतात. 'भांड्याने आणखी भांड्यांना जन्म दिला' या गोष्टीवर जर तू तुझ्या फायद्यासाठी गप्प बसलास, तर आता भांडी 'मेल्यावर' दाद मागायचाही तुला काहीही अधिकार नाही !

*Why Me ? असं विचारणाऱ्या आज जगभरातील प्रत्येकाची अवस्था गोष्टीतल्या त्या सावकारासारखी झालीय.*

*आजच बातम्यांमध्ये कोरोनामूळे द्राक्षांची निर्यात बंद झालेल्या बागायतदारांच्या मुलाखती दाखवल्या.*

 प्रत्येकाने स्वतःला किती कोटींचे नुकसान होणार आहे ते सांगितलं. त्यांचं दुःख नक्कीच समजू शकतो आणि अन्नाची नासाडी होणं वा कुणावरही संकट येणं हे वाईटच !

 *हे बागायतदार जर आपण या देशातील छोट्या उद्योजकांचे प्रतिनिधी मानले, तर या देशातील प्रत्येक उद्योजकाने त्याच्या चांगल्या दिवसातले, समृद्धीच्या काळातले गलेलठ्ठ नफ्याचे आकडे आठवावेत, मजा म्हणून केलेल्या फॉरेन ट्रिप्स आठवाव्यात, सक्सेस पार्टीज् आठवाव्यात...*

त्यावेळी विचारलं होतं का, की हे फक्त मलाच का ?

*गैरसमज नको म्हणून स्पष्ट करतो की मी सुद्धा उद्योजक आहे. कोरोनाचा फटका माझ्याही उद्योगाला बसला आहे. लाखो लोकांप्रमाणे माझंही नुकसान झालंय. पण प्रत्येक enterpreneurने  entrepreneurship नावाच्या एका कुरूप पण फक्त नवऱ्याचंच ऐकणाऱ्या एका वधुशी लग्न केलेलं असतं...आणि म्हणूनच आज माझ्याकडे शांत राहण्यावाचून पर्याय नाहीये ! (ही 'वधू' जर सुंदर असती तर जगातले सगळेच उद्योजक झाले असते !) आपलं सगळं काही ऐकणारी, कमीत कमी नातेवाईक असणारी, हवं ते देणारी बायकोही हवी पण तिचा चेहरा पहायची 'रिस्क' मी घेणार नाही, असं कसं चालेल ? जे करणं सर्वांना शक्य नाही ती गोष्ट मी करून त्या प्रीमियमचा उपभोग घ्यायचा, आणि नुकसानीची वेळ येईल तेव्हा अचानक त्यातून हात वर करायचे, हे कसं चालेल ? जी भांडी आणखी चार भांड्यांना जन्म देऊ शकतात, तीच भांडी मरू शकत नाहीत हे कसं शक्य आहे ?*

*त्यामुळे मीडियाने कोरोनाच्या परिणामांचा परामर्श जरूर घ्यावा, पण यात 'होरपळून' गेलेल्यांच्या कहाण्या तिखटमीठ लावून सांगत या देशातील तरुण पिढीसमोर उद्योगाचे चुकीचे perception निर्माण करू नये. धोनीवरच्या सिनेमात एक अप्रतिम प्रसंग आहे.*

*निराश होऊन रेल्वे प्लॅटफॉर्मवर बसलेल्या धोनीला त्याचा टीसी बॉस म्हणतो, 'सगळ्याच बॉल्सवर सिक्स मारायची नसते. बाऊन्सर येतो, तेव्हा तू काय करतोस ? हां ! डक करतोस ! लक्षात ठेव, काहीही झालं तरी स्कोअर बोर्डवरचे आकडे फिरत राहिले पाहिजेत !!'*

माझ्या सर्व उद्योजक मित्र मैत्रिणींना माझं तेच सांगणं आहे. कोरोनाचा हा बाऊन्सर डक करा..पण आऊट होऊ नका.. 

पीच सोडू नका ! त्या 'फुल टॉस'ची वाट पाहत पीचवर उभे राहा ! ही एक Unlimited overs असलेली एक 'टेस्ट मॅच' आहे. Simon Sinek म्हणतो तसा it's an infinite game !

*This too shall pass...हेही दिवस जातील...*

*वाईट दिवसांमध्ये दिलासा म्हणून आणि चांगल्या दिवसांमध्ये स्मरण म्हणून हे वाक्य मनाच्या कोपऱ्यात कायम ठेवायचं...म्हणजे बाऊन्सर आला तरी काही वाटत नाही आणि सिक्सर मारल्यावर तर त्याहून नाही!*

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट