कडकडीत कर्फ्यु आणि कोरोना
मोदी नावाच्या माणसावर लोक इतके का दातओठ खाऊन असतात याचं कारण म्हणजे आज रस्त्यारस्त्यावर असलेली शांतता.
"आम्ही सर्टिफाय नं केलेला माणूस" टीव्हीवर येतो, "मेरे प्यारे देशवासीओ" - ज्या ३ शब्दांवर महात्मा गांधी, पं नेहरू आणि इंदिरा गांधी या तिघांचीच त्रिकालाबाधित मक्तेदारी असावी यासाठी आम्ही पिढ्या न पिढ्या खपलो - असे हे ३ शब्द उच्चारतो आणि थेट जनतेच्या मनाला साद घालतो...
नोटबंदी, जीएसटी, सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक, ३७०, CAA...असे एकामागे एक कारनामे करतो...त्यांचा आम्ही पाळीव कुत्र्याप्रमाणे भुंकून भुंकून विरोध करतो - पण जनता आमच्या किंकाळ्यांना काडीची किंमत नं देता या बाबाच्या पाठीशी उभी रहाते...
हे सगळं सहन होत नाही फॅसिस्ट हुकूमशहांना.
जळजळ तिथे आहे. दुखणं तिथेच आहे.
नोटबंदी आठवून पहा. इनफॅक्ट, २०१४च्या सत्तांतरानंतर या लोकांचं रोजचं वर्तन तपासून पहा.
हा माणूस मुसलमानांना जिवंत जगू देणार नाही. मागासवर्गीयांचं आरक्षण काढून घेईल. संविधान बरखास्त करेल. पुन्हा निवडणूका होणार नाहीत. लोकशाही संपेल. देश भांडवलशांना विकून टाकेल. राष्ट्रध्वज बदलला जाईल...राष्ट्रगीत बदललं जाईल...काय काय भीती दाखवल्या गेल्या.
"ते सगळं तर घडलं नाहीच (छ्या!)...पण आम्ही इतकं ओरडून ओरडून प्रॉपगॅन्डा करू पहातो तरी आम्हाला कुण्णी कुण्णी भाव देत नाही" - हे दुःख असहनीय आहे.
नोटबंदीच्या वेळी स्वतःला गांधीवादी-लोकशाहीवादी-संविधानवादी म्हणवणाऱ्या या लोकांनी केलेली विधानं यांचं खरं रूप दाखवणारी होती. लोक रस्त्यावर उतरावेत, देशात अराजक व यादवी माजावी यासाठी हरप्रकारे प्रयत्न झाले. एकामागे एक भडकाऊ विधानं केली गेली.
३७० च्यावेळी तेच. CAA च्या ही वेळी तेच.
पण एका नरेंद्र मोदी नावाच्या माणसावर विश्वास ठेवलेल्या लोकांनी तसं काहीच घडू दिलं नाही. स्वतःला त्रास करून घेतला...सहन केलं...पण अराजक माजू दिलं नाही.
राग याचाच आहे.
महात्मा गांधी, पंडित नेहरू, इंदिरा गांधी यांचं प्रचंड मार्केटिंग केलं आहे या गॅंगने. महात्मा गांधींचं माहात्म्य पटवणाऱ्या कित्येक संस्था, प्रकाशनं सतत कार्यरत आहेत. पंडित नेहरूंच्या आठवणी तर सतत काढल्या जातात. इंदिरा गांधींची इमर्जन्सी कशी देशास उपकारक होती हे पटवण्यासाठी आयुष्य खर्ची घातलेले विद्वान आहेत आपल्याकडे.
हे असं काहीही नं करता एक माणूस उदयास येतो...सतत १८ वर्षं त्याच्या विरोधात प्रचार करूनही हा जनतेच्या मनात घर करतो...विश्वास संपादन करतो...इतका की हा टीव्हीवर येऊन अर्धा तास बोलला म्हणून लोक स्वतःला घरात कोंडून घेण्यास तयार असतात...
हे अर्थातच सहन होत नाही.
म्हणून मग जमिनीत तोंड खुपसून जगाला आपली नको ती बाजू उपडी करून दाखवतात हे लोक.
म्हणूनच जगभरात भारताच्या प्रयत्नांचं कौतुक होत असताना "मोदी कुछ नहीं कर रहा है" बोंबलतात.
आणि म्हणूनच आज संध्याकाळी ५ वाजता तुम्ही आम्ही जेव्हा कृतज्ञेतेचा गजर करू - तेव्हा या मानवतावादी, जय जगतवादी, पीडित-शोषितांच्या काळजी वाटणाऱ्या लोकांना त्या "गोंगाटा"चा भयंकर त्रास होणार आहे.
कारण आपण एक देश म्हणून, समाज म्हणून एकत्र येऊ...सद्भावनेच्या एका भावनेत बांधले जाऊ..तेही नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे म्हणून...हे सहन होणार नाही.
खरं दुखणं तिथे आहे....!
रडत रहा बाबानो.
पब्लिक सब जानती है.
सो...सी यू अॅट फाईव्ह पीएम...!
: ओंकार दाभाडकर
d.omkar1@gmail.com
टिप्पण्या