कोरोना मध्ये पाळायची पथ्य

सहा महिने हे पाळाच नाहीतर पुडच्या भाद्रपदात तुमचे कावळे जेवतील......


∆ *सोशल संबध टाळा*
🤔सोशल मिडीयावर भेटा.

∆ *नातेवाईक कितीही जवळचा असला तरी तुर्तास माया मोह टाळा.*
🤔ही वेळ भावनिक नाहीतर वास्तविकता जाणून वावरण्याची आणि जगण्याची आहे.

∆  *जवळचेच कोरोनाला जवळ आणून सोडतील, तेव्हा राग आला तरी चालेल स्पष्ट भेटण्यास येवू नका असे कळवा.*
🤔तसेही स्पष्ट बोलणारे अतिशहाण्यांच्या मते वेडेच वाटतात.

∆ *अति गरजेचे असल्याशिवाय  आपण स्वत:हुन कोणाकडे जावू नका.*
🤔कारण आता तुम्हाला छान वाटेल कोणाच्या घरी जायला पण तिथे कुणी रुग्णा आहे हे कळेल तेव्हा तुम्ही इच्छा असूनही मदतीला जावू शकणार नाही.

 ∆  *कोरोना कुणाच्या मदतीने केव्हा  घरात येईल सांगता येत नाही.*
🤔तुमची एक चुक तुम्हांला आणि दुसऱ्याला महाग पडेल हे लक्षात ठेवा,जेव्हा कोणाला खरी गरज असेल तेव्हा तुम्हीही पाठ फिरवाल कारण हा विषाणू तसाच आहे,केव्हा होत्याच नव्हतं करेल सांगता येत नाही.

∆ *कोरोनाग्रस्त रूग्णांपासुन शारिरीक दुर व्हा मनाने मात्र जवळच रहा त्यांना आधार द्या आम्हि तुमच्या सोबतच आहोत याची ग्वाही द्या.*
🤔कारण तेव्हा त्यांना तुमच्या खर्या मदतीची, प्रेमाची आणि आपुलकीची गरज आहे.

∆  *ज्यांच्या घरात लहान मुले व ६० वर्षावरील माणसे आहेत यांनी विशेष काळजी घ्यावीच.*
🤔 लहान मुलं आणि वयस्कर माणसांच्या घरात किंवा जवळही जावू नये,कारण त्यांना काही झाले तर तुम्ही स्वतःला कधीच माफ करु शकणार नाही.

∆  *अति व फाजील आत्मविश्वास बाळगू नका.*
🤔कारण फाजील आत्मविश्वास हा फाजीलच असतो,मला काही होणार नाही होत नाही होवूनही गेला गेला असेल हे फालतू वक्तव्य बंद करा.जगा आणि जगू द्या आणि मरायची हौसच असेल तर कोरोनाची वाट कशाला बघताय.
∆ *कसला कोरोना होतोय अशी बेजबाबदार भाषा अलिकडे दिसु लागली आहे.अशा लोकांना आवरा त्यांना टाळा किंवा समजावा.*
🤔ज्याची भाषाच बेजबाबदार त्याला समाज किंवा परिवार याची जबाबदारी काय कळणार.सजग नागरिक म्हणून जगायला शिका.

∆  *हात देणे अलिंगण देणे गळ्यात पडुन रडणे.लहान मुलांचा पापा घेणे देणे टाळाच. बंद करा.* 
🤔 थोडेदीवदिवस गळ्यात नाही पडले तर काय होईल,नका ना घेवू लहान मुलांना जास्त जवळ, जेणेकरुन त्यांना तुमच्या कडून संसर्ग होणार नाही याची काळजी घ्या.

∆   *जिथे गोतावळा तेथे रमतो कोरोना.*
🤔हे आज जरी खोट किंवा गमतीशीर वाटत असेल तरी ते कस खरं आहे हे पटण्यासाठी विषाची परीक्षा नका नां घेवू.

∆  *जर अकारण कुणी आपल्या घरी येणे जाणे करत असेल तर प्रेमाने महत्व समजून सांगा.*
🤔बाबारे तु तुझ्या घरी सुखी रहा आम्हांला आमच्या घरात सुखी राहू दे.खर म्हणजे तु जग आम्हाला जगू दे.

∆  *भिडस्तपणा अंगाशी येण्याचीच शक्यता जास्त आहे.*
🤔भिडस्तपणा अंगाशी येईपर्यंत नका ना वाट बघु,कदाचित् तोवर उशीर झालेला असेल किंवा वेळ निघुन गेलेली असेल.
∆ *कमी सदस्य असलेली घरे सुरक्षित आहेत.*
🤔आतातरी हेच सुरक्षित आणि सुशिक्षित पणाच लक्षण आहे.जिथे होते गर्दी तिथे कोरोना लावतो आपली वर्दी (हजेरी).

∆  *वरील सर्व कठीण आहे पण सर्वासाठी ते आवशक आहे.*
🤔कारण तुमच्या आजूबाजूला कधीही, केव्हाही,कुठेही तो येवून शिरकाव करु शकतो.

∆ *पोलीसानी डाॅक्टरांनी नर्सेसनी आपले जीवन धोक्यात घालून आपणास वाचवले आहे वाचवत आहेत तेव्हा आपण स्वत:हून आपली काळजी घ्या.*
🤔तुम्हाला स्वतःची काळजी नसेल तर जावूद्या,पण दुसऱ्याच्या जिवावर उठू नका.
∆  *प्रतीकार शक्ती वाढेल असेच अन्न सेवन करा.*
🤔 तुम्हाला सोसेल तेवढच पण पौष्टिक खा.
 *जीभेचे चोचले थांबवा*
🤔 आणि आजारपण लाबंवा.

∆  *जगाल तरच जगवाल*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🤔वैचारिक संघर्ष फक्त कोरोनाशी आहे,
वैयक्तिक कुणा माणसांशी नाही.....,,🤔👍

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट