बोर/बोअर खोदताना घ्यायची काळजी
*बोअर खोदणाऱ्या शेतकऱ्यांनो सावधान*
प्रथम सावकाश वाचा
राम राम शेतकरी बंधूंनो,
*बोरवाले* एजंट शेतकऱ्याला कसे फसवतात ते पहा.
आपण बोर वाल्याकडे जातो व विचारतो बोर काय फुट घेता तो आपल्याला सांगतो 57 रुपये फूट व किसिंग 200 रुपये फूट पण आपण त्याला विचारत नाही की सहा इंचीचा किती व 9 ईचीचा किती पण सहा इंची चा भाव तो सांगतो 57 रुपये आणि किसिंगचा भाव सांगतो दोनशे रुपये आता दोनशे रुपयाची फोड आशी आहे की पीव्हीसी पाईप चा भाव आहे.70/90 रुपये फूट आता 200 मधून 80 रुपये गेले तर खाली राहिले 120 रुपये 120 रुपये फूट नऊ इंची बोर खोदण्याचे असतात.
*उदाहरण.* आपण बोर घेतला दोनशे पन्नास फूट त्याला किसिंग लागला साठ फूट आपण हिशोब करायला जातो त्यावेळेस आपल्याला हिशोब दिला जातो 250 फुटाचे 57 रुपये व किसिंग साठ फूट दोनशे रुपये प्रमाणे हिशोब केला जातो. आता मला सांगा आपण बोर घेतला दोनशे पन्नास फूट आणि आपण पैसे दिले 310 फुटाचे म्हणजे आपण पैसे द्यायला पाहिजे होते 190 फुटायचे 57 रुपये आणि साठ फुटाचे दोनशे रुपये म्हणजे आपल्याला फसवले गेले 60 फूट 57 रुपये 3420 रुपये म्हणजे किसिंग च्या साठ फुटी खोदायचे पैसे दोनशे रुपयांमध्ये आहेत .
नऊ इंची खोदायचे दोनशे रुपये मधले 120 रुपये आणि 57 रुपये म्हणजे नऊ इंची बोर खोदायचे 177 रुपये फूट आपण देत आहोत
तरीही शेतकऱ्यांनी जागृत व्हावे म्हणजे आपली फसवणूक होणार नाही तरी हा मेसेज शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी इतर ग्रुप वर फॉरवर्ड करावा व शेतकऱ्याची फसवणूक थांबवावी . म्हणून एव्हडा प्रपंच.
धन्यवाद !!!
टिप्पण्या