आदिवासींच्या कुळसाया (कुळचीन्ह)
*कविता...७..*
*आदिवासींच्या कुळसाया (कुळचीन्ह)*
सातेवाडीची सतूआई...
फोफसंडीची दऱ्याबाई...
मोरदेव रानदेव चेडोबा...
एकदऱ्याचा वाघोबा...
सुकाळवेढेची वरसूबाई...
सातेवाडीची राणूआई...
जंगलचा वनदेव नागोबा...
ढाक आसान्याचा बहिरोबा...
शिखरावरची कळसूआई...
हातविज गावची दुर्गूबाई...
कोकणामधला म्हसोबा...
दापोडी गावचा मुंजोबा...
जुन्नर तालुक्यात वालूआई...
कथूरवंगणाची घाटनदेवी...
जव्हार तालुक्यात हिरवा देव...
कळवण मधला डोंगऱ्या देव...
अकोले तालुका काशाआई...
डोंगरावरची गडदूबाई..
नंदूरबार जिल्हा बर्डीपाडा...
तेथे नांदतो देव मोगरा...
वाघापूरची आवूबाई...
शेनित गावची वटमाई...
विज हवा पाणी वारा...
सटवाई मातेवर भरोसा सारा...
जुन्नर तांबेची मऱ्याआई...
भिमाशंकरची कळंबजाई..
पाटली देव उंबऱ्या देव...
शितल चंद्र सुर्य देव...
यताळ मावल्या नागपंचमी देवता...
कणाकणामध्ये कणसरा माता...
सह्याद्रीमध्ये यांचा मान...
आदिवासींचे श्रद्धास्थान...
*लेखन...*
*आदि-जगन सिताराम खोकले*
*सोमज,ता.इगतपूरी जि.नाशिक*
*मो. 9765457362*
टिप्पण्या