तिलका मांझी बद्दल

*आद्यक्रांतिकारक तिलका मांझी यांच्या २७५ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!*
*आद्यक्रांतिकारक तिलका मांझी*
*जन्मतारीख = ११ फेब्रुवारी १७५०*
*बलिदान दिन =१३ जानेवारी १७८५*
तिलका मांझी हा एक निर्भय योध्दा होता राजमहल, झारखंड टेकड्यांचा प्रदेशात तिलका मांझी च वर्चस्व होतं. १७७१ ते १७८४ पर्यन्त ब्रिटीश सत्तेला हादरे देण्याच आणि जमिनदारांच्या अन्याय अत्याचार विरूध्द करण्याच काम तिलका मांझी याने केले. त्यामुळेच तिलका मांझी उर्फ जबरा पहाडिया च्या विरोधात ब्रिटीश आणि जमिनीदार एक झाले होते तिलका मांझी यांना मदत करणारे लोकांवर इंग्रजांनी जुलूमशाही सुरु केली सावकारशाहीच्या दहशतीत जनता वावरत होती १७७० मध्ये संथाल प्रदेशात भीषण दुष्काळ पडला आणि लोक उपासमारीने मरत होते तिलका मांझीने ईस्ट इडिया कंपनीचा खजिना लुटून गरीब आणि गरजू लोकांमध्ये वाटून दिला.
या उदात्त कृतीने प्रेरित होऊन इतर अनेक आदिवासीही बंडात सामील झाले यातुनच त्याचा संथाल हुल,संथालांचा उठाव सुरू झाला त्यांनी इंग्रजांवर आणि सावकारवर हल्ले सुरुच ठेवले.१७७१ ते १७८४ पर्यंत तिलका मांझी यांनी कधीही आत्मसमर्पण केल नाही. इंग्रजांनी तिलापुच्या जंगलाला वेढा घातला शेवटी १७८४ मध्ये जेव्हा त्याला पकडण्यात आले तेव्हा त्याला चार घोड्याच्या पाठीला बांधुन रस्त्यावर घसरत भागलपुर येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थान पर्यंत ओढेत नेले तिथे त्यांच्या घायाळ व रक्तबांबळ आवस्थेत त्यांना जिवंत पणी फाशी देण्यात आली व लोकांमध्ये दहशद निर्माण व्हावी यासाठी त्यांना वडाच्या झाडाला लटकावले होते.तिलका मांझी देशासाठी शहीद झाले.अशा महान आद्यक्रांतीकारक शहिद तिलका मांझी उर्फ जबरा पहाडिया यांना जयंतीनिमित्त अभिवादन!
                  अभिवादक 
             *महामित्र परिवार*
  *आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड*
*अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद सिन्नर*
*सह्याद्री आदिवासी कोळी महादेव जमात संघटना सिन्नर*
🙏🌺🌸🌹🌷🌺🌸🌹🌷🙏

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट